

Candle march held in Pen against NEET paper leak by all-party and social organisations demanding justice for students
Sakal
पाली : नीट (NEET) परीक्षा पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि या धक्कादायक प्रकरणामुळे जीव गमवाव्या लागलेल्या विद्यार्थ्यांच्या स्मरणार्थ शनिवारी (ता. 25) रात्री पेण येथे सर्वपक्षीय, सर्व धर्मीय आणि विविध संघटनांच्या वतीने एकत्र येत कॅंडल मार्च काढण्यात आला. या जनआंदोलनात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) पेण शाखेने सक्रिय सहभाग नोंदवला.