esakal | गणपतीपुळे फुलले; श्रींच्या दर्शनाला मांदियाळी भाविक आले अन्‌
sakal

बोलून बातमी शोधा

people visit ganpatipule temple ratnagiri

टाळेबंदी उठल्यानंतरची संकष्टी; श्रींच्या दर्शनाला मांदियाळी, सुमारे साडेचार हजार पर्यटकांची हजेरी

गणपतीपुळे फुलले; श्रींच्या दर्शनाला मांदियाळी भाविक आले अन्‌

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी: कोरोनातील टाळेबंदीमुळे बंद असलेले मंदिरांचे दरवाजे दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर उघडल्यानंतर पर्यटनाला चालना मिळाली. त्यामुळे प्रसिद्ध श्री गणपतीपुळेमध्ये दर्शनासाठी अनेकांनी धाव घेतली. टाळेबंदी उठल्यानंतर पहिल्या संकष्टीला पश्‍चिम महाराष्ट्रासह विविध भागातील भक्‍तगणांनी गणपतीपुळ्यात हजेरी लावली. मागील पंधरवड्याप्रमाणेच सुमारे साडेचार हजार पर्यटकांनी दर्शन घेतले.

दर महिन्याला येणाऱ्या संकष्टीला पश्‍चिम महाराष्ट्रासह जिल्ह्यातील स्थानिक भक्‍तगण गणपतीपुळेत दर्शनासाठी येतात. अंगारकी संकष्टीला राज्याच्या कानाकोपऱ्यातील पर्यटक येथे येतात; परंतु कोरोनातील टाळेबंदीमुळे गेले ८ महिने मंदिरे दर्शनासाठी बंद होती. 


दिवाळीत अखेरीला मंदिरे सुरू झाल्यानंतर दिवसाला चार ते पाच हजार भक्‍तगण गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी येऊन जात आहेत. गुरुवारी (ता. ३) संकष्टीच्या दिवशी गर्दी होईल, अशी अपेक्षा होती. ती खरी ठरली. पंधरा दिवसांप्रमाणेच दिवसभरात साडेचार हजार पर्यटकांनी दर्शन घेतले. मंदिरामधून श्रीदर्शन घेऊन आल्यानंतर किनाऱ्यावर बिनधास्तपणे पर्यटकांचा राबता दिसत होता. संकष्टीला सर्वाधिक गर्दी पश्‍चिम महाराष्ट्रामधून आलेल्या भाविकांची होती. निवास करणाऱ्यांचा टक्‍का अजूनही कमी असल्याचे येथील व्यवसायिक सांगत आहेत. कोरोनातील निकषांमुळे संकष्टीला निघणारी पालखी मिरवणूक मंदिर व्यवस्थापनाने काढली नाही. 

हेही वाचा- माऊलीला रडू कोसळले अन्  दिव्यांगांना मिळाले ‘सन्मानाने अन्न’ -

व्यावसायिकांचा फायदा
देवदर्शनासाठी नारळ, फुले, हार, दूर्वा यासह प्रसादाची दुकाने, किनाऱ्यांवरील नारळ विक्रेते, उंट व घोडे यावरून रपेट घडवून आणणारे यांची चलती होती. एक दिवसाच्या पर्यटनाकडेच आलेल्यांचा कल होता. त्याचा सर्वाधिक फायदा हॉटेल व्यावसायिकांना झाला. 
 

संकष्टीला अनेक पर्यटक गणपतीपुळे येथे आले होते. त्याचा फायदा किनाऱ्यावरील फेरीवाल्यांना झाला. नियमित व्यवहारांना चालना मिळाली.
-किसन जाधव, गणपतीपुळे

 संपादन- अर्चना बनगे
 

loading image