esakal | पिंगुळी ग्रामस्थांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश 
sakal

बोलून बातमी शोधा

Pinguli Villagers Enters In NCP Ratnagiri Marathi News

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ध्येय धोरणामुळे प्रभावित होऊन व महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसची ज्या पद्धतीने संघटनात्मक ताकद वाढविण्याचे काम पक्षाचे सर्वेसर्वा खासदार पवार व त्यांची टिम करत आहे.

पिंगुळी ग्रामस्थांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - पिंगुळी येथील ग्रामस्थांनी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोगटे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांचा पक्षात यथोचित सन्मान केला जाईल, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ध्येय धोरणामुळे प्रभावित होऊन व महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसची ज्या पद्धतीने संघटनात्मक ताकद वाढविण्याचे काम पक्षाचे सर्वेसर्वा खासदार पवार व त्यांची टिम करत आहे. राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांच्या कोकणावर असलेल्या प्रेमाचा विचार करून व जिल्हाध्यक्ष अमित सामंत व अन्य पदाधिकारी यांच्या कार्यप्रणाली मुळे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील भोगटे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश झाला. प्रवेशकर्ते दिपक पिंगुळकर यांनी सांगितले.

प्रशांत पाताडे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संघटनेचा झेंडा हातात घेत आहोत. यापुढे तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची संघटना वाढीसाठी जिल्हाध्यक्ष सामंत व अन्य पदाधिकारी यांच्या सोबत एकसंघपणे माझ्या बरोबर प्रवेशकर्ते कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काम करून घर तिथे राष्ट्रवादीचे घड्याळ हे चिन्ह पोहचविणार असल्याचे सांगितले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जिल्ह्यात अन्य पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यानुसार पिंगुळी येथील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे घड्याळ चिन्ह असलेल्या झेंड्याचा स्विकार करून पक्षात प्रवेश केला. त्यात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. प्रवेशकर्त्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेस संघटनेत योग्य मान सन्मान दिला जाईल, असे सांगून यावेळी उपस्थित प्रशांत पाताडे यांचे जिल्हाध्यक्ष सामंत यांनी विशेष कौतुक केले.

यावेळी बाळ कनयाळकर, शिवाजी घोगळे, भास्कर परब, सुनिल भोगटे, नझीर शेख, अनंत पिळणकर, रूपेश जाधव, प्रतीक सावंत, सचिन तेंडुलकर, साबा पाटकर, उत्तम सराफदार, सफराज नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

संदिप पिंगुळकर, दिपक पिंगुळकर, अशोक पिंगुळकर, रमेश पिंगुळकर, सुप्रिया पिंगुळकर, दिपाली पिंगुळकर, विष्णू चव्हाण, सौ. रक्ष्मी पिंगुळकर, गोपाळ पिंगुळकर, सरिता पिंगुळकर, संपदा पिंगुळकर, दीप्ती पिंगुळकर, दिव्या पिंगुळकर, लवू पिंगुळकर, श्‍याम गोडे आदी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. 
 

 
 

loading image