Uday Samant : 'आता ढगाळ वातावरणातही विमान सुरक्षित उतरणार, ही यंत्रणा बसवण्यासाठी न्यूझीलंडमधून येणार तज्ज्ञ'

रत्नागिरी विमानतळावरच ‘व्हीओआरडीएम’ ही यंत्रणा बसवली जाणार आहे.
Uday Samant Ratnagiri Airport
Uday Samant Ratnagiri Airportesakal
Summary

विमानतळावरील दृश्यमानता वाढणार असून, वैमानिकाला विमान सुरक्षितपणे उतरविता येणार आहे.

रत्नागिरी : रत्नागिरी विमानतळावर (Ratnagiri Airport) आता ढगाळ वातावरणातही विमान सुरक्षित लॅंडिंग (उतरणे) होणे आता सोपे होणार आहे. त्यासाठी अत्याधुनिक ‘डॉफलर व्हेरिफाय ओमनीरेंज’ (डी-व्हीओआर) ही यंत्रणा रत्नागिरी विमानतळावर बसवली जाणार आहे. त्यासाठी काही दिवसातच न्यूझीलंड (New Zealand) येथून तंत्रज्ञ येणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली.

विमानतळासाठी आणखी १७ एकर जमीन संपादित करण्यात येणार आहे. सद्य:परिस्थितीत इर्मजन्सी नाईटलँडिंगही होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Uday Samant Ratnagiri Airport
Shambhuraj Desai : 'अपात्रतेच्या सुनावणीत गडबड करू नका, शिंदे गटाच्या आमदारांना बाजू मांडण्याची संधी द्या'

ते म्हणाले, अनेकदा ढगाळ वातावरण असेल तर वैमानिक धोका न पत्करता लॅंडिंग टाळतो आणि नियोजित विमानतळाऐवजी अन्य जवळच्या विमानतळांवर सुरक्षित विमाने उतरविली जातात. कोकणात पावसाळ्यात अनेकवेळा ढगाळ वातावरण असते. अशा वेळी विमान लॅंडिंग किंवा उड्डाणाला त्याचा फटका बसत असतो. हे टाळण्यासाठी रत्नागिरी विमानतळावरच ‘व्हीओआरडीएम’ ही यंत्रणा बसवली जाणार आहे.

त्यामुळे विमानतळावरील दृश्यमानता वाढणार असून, वैमानिकाला विमान सुरक्षितपणे उतरविता येणार आहे. ही अत्याधुनिक यंत्रणा रत्नागिरीत दाखल झाली आहे. ती बसवण्यासाठी न्यूझीलंड येथून तज्ज्ञ लवकरच रत्नागिरीत येणार आहेत. या विमानतळासाठी नुकतेच २७ हेक्टर जागेचे भूसंपादन करण्यात आले. आणखी १७ एकर जागा ताब्यात घेतली जाणार आहे. येथील ग्रामस्थांनीही जागा देण्याची तयारी दाखवली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Uday Samant Ratnagiri Airport
Loksabha Election : 'सर्व पक्ष एक झाले तर मोदींचा पराभव निश्चित होईल'; महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा दावा

टर्मिनल बिल्डिंगचे काम डिसेंबरपासून

रत्नागिरी येथून प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक असणाऱ्या टर्मिनल बिल्डिंगचे काम डिसेंबरपासून सुरू होणार आहे. मुंबई विमानतळ प्राधिकरणाने याची तयारी पूर्ण केली आहे. महिनाभरात प्रवासी टॅक्सी वाहतुकीसाठी आवश्यक मार्गिकेचे कामही सुरू केले जाणार आहे. याठिकाणी सद्य:स्थितीत इर्मजन्सीला नाईटलँडिंग होऊ शकते, असे कोस्टगार्डच्या अधिकाऱ्‍यांनी सांगितले असल्याची माहिती पालकमंत्री सामंत यांनी दिली.

Uday Samant Ratnagiri Airport
Chaitra Kundapur : हालश्री स्वामीजींना अटक करा, बड्या नेत्यांची नावं समोर येतील; हिंदुत्ववादी नेत्या चैत्राचं स्फोटक विधान

‘डी-व्हीओआर’ यंत्रणेचे फायदे

  • १०० किलोमीटर अंतरापर्यंत एअर ट्राफिक नियंत्रणासाठी सहाय्यक

  • विमानतळावरील नियंत्रण यंत्रणा व पायलट यांच्यात अत्याधुनिक यंत्रणेतून संपर्क साधणे शक्य

  • विमानांच्या लँडिंगला लागणारा वेळही कमी होणार

  • हवाई सुरक्षितताही आणखी मजबूत होणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com