esakal | प्लास्टिक कचरा गॅसीफायरद्वारे होणार नष्ट 
sakal

बोलून बातमी शोधा

प्लास्टिक कचरा गॅसीफायरद्वारे होणार नष्ट 

गुहागर - दापोली तालुक्‍यातील कोळथरे गाव प्लास्टिकमुक्त होण्यासाठी तेथील सरपंच ज्योती महाजन यांनी एक अभिनव उपक्रम राबविला. या उपक्रमाला ग्रामस्थांकडून प्रतिसाद मिळाला. व्हर्जिन विंडस्‌ या हॉटेलमधील गॅसीफायर उपकरणाद्वारे संपूर्ण प्लास्टिक कचरा नष्ट केला जाणार आहे. 

प्लास्टिक कचरा गॅसीफायरद्वारे होणार नष्ट 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गुहागर - दापोली तालुक्‍यातील कोळथरे गाव प्लास्टिकमुक्त होण्यासाठी तेथील सरपंच ज्योती महाजन यांनी एक अभिनव उपक्रम राबविला. या उपक्रमाला ग्रामस्थांकडून प्रतिसाद मिळाला. व्हर्जिन विंडस्‌ या हॉटेलमधील गॅसीफायर उपकरणाद्वारे संपूर्ण प्लास्टिक कचरा नष्ट केला जाणार आहे. 

हा कचरा साठविण्यासाठी डंपिंग ग्राउंड तयार करण्याचा आग्रह आहे. कोळथरेतील सरपंच महाजन यांचा डंपिंग ग्राउंडला विरोध होता. प्लास्टिक कचरा नष्ट करण्यासाठी अनेक उपकरणे पाहिली; मात्र ग्रामपंचायतीचे उत्पन्न, यंत्राची किंमत आणि देखभालीचा खर्च याचे प्रमाण व्यस्त होते. महाजन यांना गावातील व्हर्जिन विंडस्‌ या हॉटेलचे मालक दातार यांनी गॅसीफायर दाखविला. त्यामध्ये 1200 डिग्री सेल्सिअस तापमानाला प्लास्टिक जळून राख होते. त्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा फायदा हॉटेलमधील पाणी तापविण्यासाठी होतो. महाजन यांनी ग्रामपंचायतीचा कचरा घ्यावा, अशी विनंती केली. दातार यांनी ती मान्य केली. 

ग्रामसभेत महाजन यांनी ग्रामस्थांना प्लास्टिकचा सुका कचरा वेगळा करण्याचे आवाहन केले. या उपक्रमात विद्यार्थ्यांची मदत ग्रामपंचायतीने घेतली. योग्य प्रकारे कचऱ्याची वर्गवारी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकाचे काम केले. गाडीने सर्व वाड्यांतील कचरा व्हर्जिन विंडस्‌मध्ये साठविण्यात आला आहे. हॉटेलच्या गरजेप्रमाणे हा कचरा नष्ट केला जात आहे. 

गॅसीफायर तंत्रज्ञान 
पाणी गरम करण्यासाठी अनेक ठिकाणी बॉयलरचा वापर केला जातो. गॅसीफायर हे उपकरण त्यापैकी एक आहे. पुण्यातील दातार यांनी हे उपकरण विकसित केले आहे. या बॉयलरसदृश उपकरणात सुरवातीला लाकडे पेटवावी लागतात. उपकरणातील ब्लॉअरद्वारे भट्टीतील तापमान 1200 डिग्री सेल्सिअसला नेले जाते. त्यानंतर थोडा थोडा प्लास्टिकचा सुका कचरा या उपकरणात टाकल्यास तो संपूर्ण जळून जातो. त्याचा धूर होत नाही. यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेवर पाणी तापविले जाते. सध्या याच ऊर्जेवर वीजनिर्मितीबाबतचे संशोधन अंतिम टप्प्यात आहे. या उपकरणाचे बाजारमूल्य सुमारे 1.50 लाख आहे. 

loading image
go to top