कायदा झुगारून सोशल क्लबमध्ये केलेली गर्दी अंगलट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी येथील पोलिस स्थानकमध्ये स्वरुप सोशल क्‍लब व क्रीडामंडळ वेतोरे यामध्ये गर्दी करून खेळात सहभागी झाल्याच्या प्रकारावरून गुन्हे दाखल करण्यात आले. 

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - कोरोनामुळे सोशल क्‍लब चालविण्यास बंदी असताना वेतोरेतील सोशल क्‍लब चालू ठेवल्याने व त्याठिकाणी मोठी गर्दी झाल्याने ओरोस येथील स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने शुक्रवारी (ता. 29) सायंकाळी कारवाई करत 31 जणांना ताब्यात घेतले. त्याठिकाणी असलेल्या 10 दुचाकी, 1 मोटार ताब्यात घेण्यात आली. 

या सोशल क्‍लबचा अधिकृत परवाना आहे; पण जिल्हाधिकाऱ्यांचे कोविड-19 अंतर्गत बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई ओरोस जिल्हा मुख्यालयातील एलसीबीचे पोलिस निरीक्षक सुनील धनावडे यांच्यासह उपनिरीक्षक एस. एम. शेळके, हवालदार सुधीर सावंत, आशिष गंगावणे, पोलिस नाईक, अनिल धुरी, कॉन्स्टेबल सत्यजित पाटील, रवी इंगळे, ज्ञानेश्‍वर कांदळगावकर, संदीप नार्वेकर या पथकाने केली. 

कोरोनामुळे सोशल क्‍लब चालविण्यास बंदी असताना क्‍लब चालू ठेवल्याने कारवाई करण्यात आली आहे. राज्य कोविड-19 प्रतिबंधक अधिनियम कलम 11, संसर्गजन्य रोग पसरविण्याची कृती केल्याप्रकरणी आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी येथील पोलिस स्थानकमध्ये स्वरुप सोशल क्‍लब व क्रीडामंडळ वेतोरे यामध्ये गर्दी करून खेळात सहभागी झाल्याच्या प्रकारावरून गुन्हे दाखल करण्यात आले. 

रुपेश सावंत (वेतोरे), विश्‍वास परुळेकर (वेंगुर्ला), प्रमोद गावडे (कोचरा), प्रवीण कोचरेकर (चेंदवण), विठ्ठल पारकर (हुमरमळा), विलास म्हापणकर (पिंगुळी), सुनील भोगटे (कुडाळ), संभाजी गावडे (माड्याचीवाडी), गंगाराम पालकर (वेतोरे), अरुण राऊळ (माड्याची वाडी), दीपक भोगटे (पावशी), प्रशांत नाईक (होडावडे), सिद्धेश मुंगारे (सांगिर्डेवाडी-कुडाळ), मोहन जाधव (होडावडे), किशोर धुरी (आडेली), प्रभाकर राठोड (कुडाळ), बाळू पवार (पिंगुळी), राजू राठोड (कुडाळ), प्रशांत पाताडे (वालावल), मेघःश्‍याम राऊळ (तेंडोली), उमेश कानडे (हुमरमळा), मंदार वालावलकर (हुमरमळा), रविद्र धावडे (वेंगुर्ला), संजय नाईक (मठ), विलास वाळवे (गोवेरी), सचिन गोवेकर (केळुस), सुरेश पवार (कुडाळ), विजय गिरकर (वेंगुर्ला), गजानन शिरसाट (कुडाळ), किरण पाटील (वेंगुर्ला), संदिप चिचकर (वेतोरे) यांचा यात समावेश आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार सचिन सावंत करीत आहेत.   
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police action social club vetore sindhudurg district