कोकण : शिमगोत्सवानंतर मोठ्या राजकीय उलथापालथची शक्‍यता

political changes in ratnagiri after the festival of shigmo
political changes in ratnagiri after the festival of shigmo
Updated on

रत्नागिरी : शिमगोत्सवानंतर जिल्ह्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्‍यता आहे. सत्तेत असतानाही अंतर्गत मतभेदामुळे त्यांच्यात दोन गट पडले होते. दोन्ही गटांची ताकद वाया जाऊन याचा फटका वारंवार पक्षाला बसत होता. मात्र, आता या दोन्ही गटांमध्ये समझोता झाल्याने आधीच मोठी ताकद असलेला पक्ष आता आणखी मजबूत झाला आहे. 

दोन्ही गटांनी आपापल्या विधानसभा मतदार संघात हस्तक्षेप न करता मदत करण्याचे वचन दिले आहे; मात्र कुरघोड्या करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे त्यामुळे धाबे दणाणले आहेत. जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांसह याची झळ थेट लोकसभा मतदारसंघाला बसण्याची दाट शक्‍यता आहे. जिल्ह्यातील मोठा आणि सत्तेत असलेल्या या राजकीय पक्षात अलीकडच्या काळातच हा समझोता झाला. त्याचा मोठा फायदा दोन्ही विधानसभा मतदारसंघ बांधण्यात होणार आहे. वैयक्तिक स्तरावर काही वर्षांपूर्वी झालेल्या वादातून स्वकीयांकडूनच खिंडीत पकडण्याचा डाव सुरू होता; मात्र यातून दोघांचीही ताकद वाया जात होती. मोठा मनस्ताप होत होता.

दोघांच्याही हे लक्षात आल्यानंतर समुद्रकिनारी एका निवासस्थानी मिटिंग ठरली आणि त्यांच्यात समझोता एक्‍स्प्रेस यशस्वी धावली. आता दोन्ही गटांचे संबंध दृढ झाले आहेत, की त्याच्या मतदारसंघात हे आणि यांच्या मतदारसंघात ते अजिबात हस्तक्षेप करीत नाहीत. या दोघांच्या वादाचा फायदा उठविण्यासाठी कुरघोड्या करणारे जिल्हास्तरीय नेते आता अडचणीत आले आहेत. दोन गटाचे मनोमिलन झाल्याने काही नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्या पदाधिकाऱ्यांनी लोकसभा मतदारसंघाच्या नेतृत्वाचे कान भरण्यास सुरवात केल्याने दोन्ही गट त्या पदाधिकाऱ्यांविरोधात एकवटल्याचे बोलले जाते. 

पक्षश्रेष्ठींकडे उघडपणे तक्रार

काही दिवसांपूर्वी एका विधानसभा मतदारसंघाच्या गटाने थेट लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्वासह संपर्क आणि जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या पदाधिकाऱ्यांविरोधात पक्षश्रेष्ठींकडे उघडपणे तक्रार केली. सर्व विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी स्थानिक पातळीवर केलेले काम आणि कार्यकर्त्यांची फळी यामुळे या नेत्याचा निवडणुकीत निभाव लागला. आता मोठा राजकीय भूकंप घडविण्याच्या तयारीत दोन्ही गट असल्याची चर्चा आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com