nalini mhatre
sakal
पाली - अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी सुरु असलेली तिरंगी लढत अनपेक्षित वळणावर येऊन ठेपली आहे. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी (ता. 8) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नलिनी म्हात्रे यांनी उमेदवारी मागे घेत भाजपचे उमेदवार पराग मेहता यांना पाठींबा जाहीर केला. या निर्णयामुळे निवडणुकीचे संपूर्ण चित्र पालटले असून शिवसेनेच्या (बाळासाहेब ठाकरे) कल्याणी संदीप दपके यांच्यात आता चूरशीची लढत होणार आहे.