
रत्नागिरी : कोविड- 19 मुळे 21 दिवसांसाठी टाळेबंदी झाल्याने ऐन लग्नसराई व फोटोग्राफीच्या हंगामात फोटोग्राफी व्यवसायावर संकट कोसळले. कोणीही फोटोग्राफर घाबरून न जाता त्याला बळ मिळण्याकरिता कर्हाड येथील कलबुर्गी फोटोजच्या अवधूत कलबुर्गी हे व्हॉट्सअप ग्रुपद्वारे दररोज एका विषयावरील चर्चासत्र घडवून आणत आहेत. यामुळे सकारात्मक उर्जा मिळाली आहे.
मानसिक बळ आणि फोटोग्राफी व्यवसायातील नवीन आव्हाने, त्यासाठी मदत, अनुभव आदींचे शेअरिंग सुरू झाले. सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, मुंबईतील 250 फोटोग्राफर्स या ग्रुपमध्ये आहेत. व्यापारक्षेत्रातील अडचणीच्या काळात एकमेकांशी स्पर्धा टाळून सकारात्मकतेचा संदेश देणारा हा कदाचित पहिला-वहिला प्रयोग ठरला आहे.
व्हॉट्सअपद्वारे दररोज एक तास उपक्रम
सोशल मीडियाद्वारे थेट संपर्क साधून चर्चा केली जाते. व्हॉट्स अॅपमुळे एकाच वेळी बरेच फोटोग्राफर्स एकमेकांशी कनेक्ट झाले. दररोज एक तास हा उपक्रम सुरू आहे. अडचणीच्या या काळात दिलासा व उभारी देणारा आणि आपल्या व्यवसायाकडे सकारात्मकतेने बघण्याचा दृष्टीकोन देणार्या या उपक्रमास कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील फोटोग्राफर्सनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.
अशी होते ग्रुपवर चर्चा
आतापर्यंत या ग्रुपवर वेळेचा सदुपयोग, फोटोग्राफी आणि पूरक व्यवसाय, व्हिडिओग्राफीतील संधी, स्वतःचे व प्रॉडक्टचे प्रेझेंटेशन, डीएसएलआर आणि मिररलेस कॅमेर्यातील फरक व उपयुक्तता यावर चर्चा झाली. तसेच प्रिंटींग टेक्नॉलॉजी, माझे ग्राहकाशी नाते, फोटो, व्हिडिओ एडिटिंग, अल्बम डिझायनिंग, कॅमेरा आणि लेन्सची काळजी, लेन्सचे महत्त्व, फोटोग्राफी आणि पूरक व्यवसाय, टीटीएल व मॅन्युअल फ्लॅशमधील फरक या विषयांवर चर्चा झाली.कोविड-10 मुळे आता फोटोग्राफर्सला व्यावसायिक दृष्टीकोन बदलावा लागणार आहे, कोरोना आव्हानामुळे गळेकापू स्पर्धा, दराची मारामारी, वेळेवर सेवा अशा नवनवीन संकल्पनांचा विचार करावा लागेल. व्यवसायवृद्धीसाठी काय काय करता येईल, यासंदर्भातील चर्चा ग्रुपवर सुरू आहे.
ग्रुपमुळे सकारात्मक चर्चा
“फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर्सकडे बुकिंग झालेले विवाह, साखरपुडा, धार्मिक व अन्य विविध कार्यक्रमांचे काम पुन्हा मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. प्रत्येकाला आपल्या व्यवसायाची चिंता आहे. या ग्रुपमुळे सकारात्मक चर्चा होत आहे.”
अवधूत कलबुर्गी, कर्हाड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.