रत्नागिरीची तीन झोनमध्ये होणार विभागणी : उदय सामंत

Ratnagiri district is divided into three zones kokan marathi news
Ratnagiri district is divided into three zones kokan marathi news
Updated on

रत्नागिरी : कोरोनावर येत्या काळामध्ये मात करण्यासाठी राज्याचे रेड, ऑरेंज आणि  ग्रीन असे तीन झोन करण्यात आले आहेत. रत्नागिरी ऑरेंज झोनमध्ये येतो. मात्र आम्ही जिल्ह्याची स्वतंत्र तीन झोनमध्ये विभागणी करणार आहोत. कोणत्या भागाला रेड झोन, ग्रीन झोन आणि ऑरेंज झोनमध्ये घ्यायचा याबाबत अभ्यास सुरू आहे. लवकरच जिल्ह्याची तीन झोन मध्ये विभागणी करण्यात येईल,अशी माहिती उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी दिली. 

व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकार परिषद झाली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे उपस्थित होते. ते म्हणाले, कोरोनासंदर्भातील नुकतीच आढावा बैठक घेतली. सध्या जिल्ह्यात 3 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे आपण 10 पेक्षा कमी गटात कार्यान्वित असलो तरी शासनाकडून गाईडलाईन येईपर्यंत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही. राज्यात तीन झोन केले असले तरी आम्ही जिल्ह्यात स्वतंत्र तीन झोन तयार करणार आहोत. याचा अहवाल तयार करण्याची प्रकिया सुरू झाली आहे. या संदर्भात सर्व निर्णय जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा घेणार आहेत.

 जिल्हाधिकारी घेणार निर्णय
जिल्ह्यात कोरोनाबाधित क्षेत्रात आरोग्य कर्मचार्‍यांकडून यशस्वीरित्या सर्व्हे पूर्ण झाला आहे. अद्यापही बहुतांश अहवाल येणे बाकी आहे. टप्याटप्याने हे अहवाल जिल्हा शासकीय रुग्णालयाला प्राप्त होतील. नागरिकांनी लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवल्यास कडक कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा यावेळी मंत्री उदय सामंत यांनी दिला.

 विभागणी अहवाल प्रकिया सुरू

जिल्ह्यात डॉक्टरांसाठी पुरेसे पीपीटी कीट उपलब्ध झाले आहेत. यामध्ये खासदार विनायक राऊत यांनी 1 हजार 500 कीट दिले आहेत, तर 700 कीट प्रशासनाकडून खरेदी करण्यात आले आहेत. त्यामुळे सुरवातीला जी पीपीटी कीटची समस्या होती ती आता दूर झाली आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयात ही कीट वितरित करण्यात आली आहेत. बाहेरच्या जिल्ह्यातून कोणीही येणार नाही याची खबरदारी पोलिस, प्रशासनाने उत्तमरित्या घेतली असून कोणी नियम मोडल्यास त्याच्यावर कडक करण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले. 

हेही वाचा- मुंबई-गोवा चौपदरीकरणाला परवानगी, पण काही अटी ​

स्पर्धा परीक्षेसाठी वयोमार्यादेत 1 वर्षे वाढ 

स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांच्या वयोमार्यादेत 1 वर्षे वाढ करावी, अशी मागणी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार आहे. कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे एमपीएससी आणि युपीएसी परीक्षा यंदा होणार की नाही याबाबत साशंकता आहे. त्या परीक्षा रद्द झाल्या तर ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपत आली आहे. त्यांच्यावर अन्याय होईल. भविष्यात त्यांना परीक्षा देता येणार नाही. त्यांना न्याय मिळावा, यासाठी हा प्रयत्न आहे, असे सामंत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com