मच्छीमारांनो सावधान...! समुद्रात जाताय ? तुमच्यासाठी आहे ही महत्वाची बातमी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 September 2020

किनारपट्टीच्या सखल भागात जास्त करून मालवण व मुणगे परिसरात लाटांचा जास्त प्रभाव राहण्याची शक्‍यता आहे.

सिंधुदुर्गनगरी : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या सूचनांनुसार ९ सप्टेंबरपर्यंत समुद्र खवळलेला राहण्याची शक्‍यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा - तुमचं जनावर चोरीला गेले आहे ? आता ते परत मिळु शकतं ; कसे ते वाचा

आजपासून ९ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्याच्या किनारपट्टीच्या भागात समुद्र खवळलेला राहण्याची शक्‍यता आहे. किनाऱ्यावर मोठ्या लाटा धडकण्याची शक्‍यता आहे. किनारपट्टीच्या सखल भागात जास्त करून मालवण व मुणगे परिसरात लाटांचा जास्त प्रभाव राहण्याची शक्‍यता आहे. या कालावधीत समुद्रात सुमारे १.८ ते २.४ मीटर उंचीच्या लाटा उसळतील. तरी त्या अनुषंगाने किनारपट्टीच्या भागात विशेष दक्षता घेण्यात यावी.

हेही वाचा -  बघा... काय निसर्गाची लहर...! तब्बल महिण्याआधीच मोहर 

किनाऱ्यावर मोठ्या लाटा उसळण्याची शक्‍यता असल्याने नौका किनाऱ्याजवळ न नांगरता सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात, नांगरलेल्या बोटी एकमेकांपासून सुरक्षित अंतरावर ठेवाव्यात, या कालावधीत समुद्रात कोणत्याही जलक्रीडा प्रकार सुरू ठेवू नयेत. अनुचित घटना घडल्यास संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the possibility of see atmosphere change from 9 the september fisherman take precautions in ratnagiri