esakal | बघा... काय निसर्गाची लहर...! तब्बल महिण्याआधीच मोहर
sakal

बोलून बातमी शोधा

before one month fruit seed generate in ratnagiri

कडकडीत उन्हामुळे जमिनही तापली असून त्याचा परिणाम आंबा कलमांवर दिसू लागला आहे.

बघा... काय निसर्गाची लहर...! तब्बल महिण्याआधीच मोहर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : गेल्या आठ दिवसांत अपवाद वगळता पावसाने विश्रांती घेतली आहे. दिवसा कडकडीत ऊन पडत आहे. वातावरणातील बदलाचा परिणाम आंबा पिकावर दिसू लागला आहे. रत्नागिरी तालुक्‍यातील काही कलमांना पालवी फुटण्याची शक्‍यता आहे. त्यावर पाऊस झाला तर पालवी कुजून जाईल आणि भविष्यात पालवीसाठी बागायतदारांना प्रतीक्षा करावी लागेल. ही पालवी आंबा उत्पादनावर परिणामकारक ठरू शकते.

हेही वाचा -  खातेदारांनो तुमची प्रतिक्षा आता संपली ; एका महिन्यात मिळणार मोबदला 

जिल्ह्यात २८ ऑगस्टनंतर पावसाचा जोर ओसरला. दररोज सरासरी १० मि.मी.पेक्षा कमी पावसाची नोंद होत आहे. दिवसातून एखादी पावसाची सर पडत आहे. दिवसा पडणाऱ्या कडकडीत उन्हामुळे उष्माही वाढलेला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी पाऊस कमी झाला आहे. जुलै, ऑगस्ट या दोन महिन्यात पावसाने सरासरी गाठली; परंतु सप्टेंबरच्या सुरवातीला पावसाने विश्रांती घेतली होती. कडकडीत उन्हामुळे जमिनही तापली असून त्याचा परिणाम आंबा कलमांवर दिसू लागला आहे.

गेल्या दोन दिवसात काही झाडांवर पालवी येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. फांदीला कोंब आलेले असून वातावरण असेच राहिल्यास पूर्णतः पालवी येईल. पण पाऊस सुरु झाला तर मात्र फांदीला आलेले कोंब किडींच्या प्रादुर्भावामुळे कुजून जातील, असा अंदाज बागायतदारांकडून वर्तविला जात आहे. उन्हाचा ताप वढल्यामुळे हे चित्र रत्नागिरी तालुक्‍यात काही ठिकाणी दिसत आहे. ही पालवी ऑक्‍टोबर महिन्यात दिसते. यंदा एक महिना आधीच पालवी येण्यास सुरवात झाली आहे.

हेही वाचा - चिंताजनक! नवे 76 बाधित; दोन मृत्यू, संस्थात्मक क्‍वारंटाईनची संख्या 20 हजारावर 

एखादा बागायतदाराने त्यावर फवारणी केली तर त्यातून उत्पादन येऊ शकते. या झाडांना फेब्रुवारी महिन्यात आंबे लागतील. हवामान विभागाकडूनही गेल्या दोन दिवसात मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तविली होती. रविवारी (ता. ६) रात्री हलक्‍या सरीही पडल्या होत्या. सध्याच्या स्थितीत आलेली पालवी जपण्याच्या मानसिकतेत बागायतदार दिसत नाहीत.

"ऑक्‍टोबर हिटमुळे येणारी पालवीची प्रक्रिया एक महिना आधी सुरू झाली आहे. हे वातावरणातील बदलांचे परिणाम आहेत. या परिस्थितीत पाऊस पडला तर पालवी कुजून जाईल."

- राजेंद्र कदम, आंबा बागायतदार

संपादक - स्नेहल कदम

loading image