मोबाईल अॅपच्या माध्यमातून बंद करता येणार विजेचे मीटर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

कणकवली - वीज वितरण कंपनी आता ग्राहकांसाठी अत्याधुनिक स्मार्ट मीटर घेऊन येणार आहे. यामुळे ग्राहकांना विजेचे बिल योग्य पद्धतीने दिले जाणार असून वितरण कंपनीचा खर्चही कमी होणार आहे. ग्राहकांना मोबाईल ऍपच्या माध्यमातून आपल्या घरातील वीज मीटर बंद करता येणार आहे. 

वीज वितरण कंपनीतर्फे ग्राहकांना घराघरांत लावलेले वीजमीटर हे बहुतांश नादुरूस्त असतात. योग्य पद्धतीने रीडिंगही होत नाही. त्यामुळे ग्राहकांना अंदाजे वीजबिल आकारले जाते. बऱ्याचदा मागील महिन्यातील विजेच्या वापरावरून बिल आकारण्याचे प्रकार सऱ्हास घडतात. यातून ग्राहक आणि वीज वितरण कंपनीलाही तोटा सहन करावा लागतो. आता यावर पर्याय म्हणून अत्याधुनिक स्मार्ट मीटर येऊ घातले आहेत. घरातील लाईट, टीव्ही किंवा अन्य विजेची उपकरणे बंद करायची राहून जातात; मात्र स्मार्ट मीटर ग्राहकांना मिळाल्यानंतर मोबाईल ऍपच्या माध्यमातून घरातील वीजमीटरद्वारे होणारा विद्युतपुरवठा बंद करता येणार आहे. यामुळे ग्राहकांना आपल्या वीजमीटरमधून वीजचोरी होत असल्यास माहिती मिळणार आहे.

वीजवितरण कंपनीलाही वीजमीटर रीडिंग घेणे आणि बिलवाटपाचा खर्चही कमी होणार आहे. विजेची चोरी होत असल्यास याची माहिती कंपनीला तत्काळ मिळणार आहे. या वीजमीटरमध्ये कोणताही बदल ग्राहकाला करता येणार नाही. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Power meter to be shut down through the mobile app