तरीही काँग्रेसचेच काम करण्यावर यादव ठाम

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 May 2019

चिपळूण - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचा उमेदवार पराभूत झाला असला, तरी तालुक्‍यात पक्षाला चांगली मते मिळाली आहेत. तालुक्‍यात पक्ष जिवंत आहे हे मिळालेल्या मतदानातून स्पष्ट झाले आहे. माझे पद राहिले नाही तरी कॉंग्रेसचे काम करत राहणार आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी दिली.

निकालासंदर्भात ते "सकाळ'शी बोलत होते.  लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका दुरुस्त करून विधानसभेसाठी कामाला लागलो आहोत. तळागाळातील कार्यकर्त्यांची फळी उभी करून कार्यकर्त्यांना बळ द्यावे लागणार आहे. ते काम करणार असे सांगून ते म्हणाले, ""लोकसभेत कॉंग्रेसच्या जागा वाढल्या आहेत. राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष झाल्यापासून कॉंग्रेस बदलली आहे. त्यामुळे भविष्यात कॉंग्रेसला अच्छे दिन येणार आहेत. 
रत्नागिरीत यापुढे कॉंग्रेस आणि राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर ग्रामीण भागात फिरलो. मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला. लोकसभा निवडणुकीत पक्षाचा उमेदवार नवीन होता. मतदारांपर्यंत उमेदवार पोहोचला नाही.

निवडणुकीदरम्यान काही विषयात कमी पडलो; मात्र ग्रामीण भागातील मतदार आणि कार्यकर्ते स्वतःहून फोन करून प्रतिसाद देत होते. अनेकांनी स्वखर्चाने बूथ लावले. काँग्रेसच्या उमेदवाराला पडलेल्या मतांचा विचार करता तालुक्‍यात काँग्रेस जिवंत आहे. कार्यकर्त्यांना बळ देण्याची गरज आहे. आता पूर्वीची काँग्रेस राहिलेली नाही. पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी नेमलेले प्रभारी बी. एम. संदीप झटपट निर्णय घेतात. त्यामुळे विधानसभेच्या पार्श्‍वभूमीवर पक्षात चांगले निर्णय होतील. कार्यकर्त्यांना बळ मिळेल.'' 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prashant Yadav comment