घरात अनेकांना कोरोना, वडिलांचा मृत्यू; दुःख पचवून UPSC मध्ये यश

वडिलांचे निधनानंतरही सोडली नाही जिद्द
प्रथमेश राजेशिर्के
प्रथमेश राजेशिर्केsakal

चिपळूण : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या युपीएसस्सी मुख्य परीक्षेच्या दोन महिने अगोदर घरातील १३ कोरोनाबाधित, त्यातच वडिलांचे झालेले निधन आणि कोरोनामुळे १६ किलो घटलेले वजन. अशा विचित्र परिस्थितीत तालुक्यातील मांडकी येथील प्रथमेश अरविंद्र राजेशिर्के यांनी जिद्द न सोडता युपीएसस्सी परीक्षेत मिळवलेले यश स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांना प्रेरणादायी ठरले आहे. इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर एक वर्ष नोकरी करून त्यानंतर गेल्या दोन वर्षात प्रथमेशने युपीएससीसाठी घेतलेली मेहनत वाखाणण्यासारखी ठरली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत मांडकी येथील प्रथमेश अरविंद राजेशिर्के यांनी २३७ क्रमांकाने उत्तीर्ण होत बाजी मारली. प्रथमेशने दहावीपर्यंतचे शिक्षण डेरवण येथील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पूर्ण केले. त्यानंतर सांगली येथील वालचंद महाविद्यालयात इंजिनिअरिंगची पदवी शिक्षण घेतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षेविषयीची माहिती घेत सुरवात केली. पदवी शिक्षण घेतानाच कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून पुणे येथे नोकरी मिळाली. एक वर्षभर त्यांनी पुण्यात नोकरी केली; मात्र नोकरीदरम्यान युपीएसस्सीच्या अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी नोकरी सोडली. त्यानंतर चिपळुणात खोली घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला.

प्रथमेश राजेशिर्के
Modi in UN : भारताची प्रगती होते तेव्हा जगाचाही विकास होतो - मोदी

दिल्ली येथे दीड वर्षे युपीएसस्सी परीक्षेचा सराव केला. त्यांनी राज्य सरकारची सारथी परीक्षा दिली होती. त्यामध्ये त्यांना चांगले गुण मिळाले. १३ हजाराची प्रति महिना स्कॉलरशिप मिळाली. यातूनच त्यांचा दिल्ली येथे परीक्षेचा अभ्यास सुरू होता. गेल्या वर्षी यूपीएससीची पूर्व परीक्षा चार मार्कांनी हुकली. त्यानंतर कोरोना कालावधीत घरी येऊनच स्पर्धा परीक्षेला जोमाने सुरवात केली. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुख्य परीक्षेपूर्वीच दोन महिने अगोदर वडिलांचे निधन झाले. ते तीस दिवस उपचारासाठी रुग्णालयात होते. त्याचवेळी घरात तेराजण कोरोनाबाधित होते.

प्रथमेश यांनाही काही महिन्यापूर्वी कोरोनाची लागण झाली. या कालावधीत त्यांचे १६ किलो वजन घटले. ऑक्सिजन घ्यायलादेखील त्यांना त्रास होत होता. ऑक्सिजन पातळी कमी-जास्त होत होती. तरीही त्यांनी युपीएससी परीक्षेत यश मिळवण्याचे ध्येय ठेवले होते. रात्रंदिवस त्यांचा अभ्यास सुरू होता आणि अखेर शुक्रवारी जाहीर झालेल्या निकालात प्रथमेश २३७ सहाव्या क्रमांकाने युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाले. आमदार शेखर निकम यांच्यासह लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी प्रथमेश शिर्के यांची भेट घेत त्यांचा गौरव केला. त्याला वडिलांचे, सख्खा मावसभाऊ उमेश राजेशिर्के, बहिणींचे मार्गदर्शन लाभले. यापूर्वी चिपळुणातील अश्विनी जोशी यांनी युपीएससी परीक्षेत यश मिळवले होते.

"युपीएससी परीक्षेसाठी देशभरातून सुमारे साडेसहा लाख विद्यार्थी पूर्व परीक्षेला बसले होते. त्यातील १० हजार ३५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील २ हजार ४७ विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी निमंत्रित करण्यात आले. मुलाखतीमधून ७६१ विद्यार्थ्यांची निवड झाली. या परीक्षेत यश मिळवायचेच ही शेवटपर्यंत चिकाटी ठेवली होते आणि गेल्या तीन-चार वर्षात घेतलेल्या मेहनतीला फळ आले."

-प्रथमेश अरविंद राजेशिर्के, मांडकी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com