Vanarlingi Sulka : जिद्द असावी तर अशी! पडवेच्या सुपुत्राने अवघ्या दीड तासात खडा पारसी सुळका केला सर

खडा पारसी सुळक्याची जमिनीपासून उंची सुमारे साडेचारशे फूट असून सुमारे नव्वद अंश कोनामध्ये उभा आहे.
Vanarlingi Khada Parsi Sulka
Vanarlingi Khada Parsi Sulkaesakal
Published on
Summary

छत्रपती शिवाजी महाराज यांची विचारसरणी आणि कार्यपद्धतीतून प्रेरित होऊन सह्याद्रीतील गडकोट व निसर्ग भटकंतीचे वेड लागल्याचे प्रथमेश सांगतात.

राजापूर : रखरखते ऊन, वेगाने वाहणारा सोसाट्याचा वारा,अशा प्रतिकूल स्थितीशी दोन हात करीत जमिनीपासून सुमारे साडेचारशे फूट उंचीचा पुणे येथील वाणरलिंगी उर्फ खडा पारसी सुळका तालुक्यातील (Vanarlingi Sulka Khada Parsi) पडवेचे सुपुत्र प्रथमेश वालम यांनी अवघ्या दीड तासामध्ये सर केला.

Vanarlingi Khada Parsi Sulka
IND vs AUS ICC World Cup 2023 Final : रोहित शर्मा-राहुल द्रविडची 'रोरा'वणारी जोडी

ही मोहीम म्हणजे मानसिक आणि शारिरीक क्षमतेची जणू काही अग्नीपरीक्षाच. अशा स्थितीतही जिद्द आणि स्वतःच्या क्षमतेवरील दृढ विश्‍वासाच्या बळावर प्रथमेश वालम यांनी सुमारे नव्वद अंश कोनामध्ये उभा असलेला खडा पारसी सुळका सर करण्याची ही मोहीम अवघ्या दीड तासामध्ये फत्ते केल्याबद्दल प्रथमेश यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची विचारसरणी आणि कार्यपद्धतीतून प्रेरित होऊन सह्याद्रीतील गडकोट व निसर्ग भटकंतीचे वेड लागल्याचे प्रथमेश सांगतात. पुणे येथे नोकरी करीत असतानाही त्यांनी गडकिल्ले सर करण्याचा छंद कायम जोपासताना त्यांनी दुर्गवीर प्रमोद मांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे दीडशेहून अधिक गडकिल्ले आजपर्यंत सर केले आहेत. गिर्यारोहकांसाठी चढण्यासाठी अत्यंत कठीण अन् अवघड असलेला जुन्नर (जि. पुणे) येथील नाणेघाटत वसलेला वाणरलिंगी उर्फ खडा पारसी सुळका नेहमीच गिर्यारोहकांसाठी आव्हान आहे. प्रथमेश यांनाही किल्ले चंदेरीचे आव्हान पेलण्याचा निर्धार केला.

Vanarlingi Khada Parsi Sulka
Lek Ladki Yojana : 'लेक लाडकी' आता नव्या स्वरूपात; शासन देणार 1 लाख 1 हजार रुपये, मुलींच्या शिक्षणासाठी होणार मदत

वाणरलिंगी उर्फ खडा पारसी सुळक्याची जमिनीपासून उंची सुमारे साडेचारशे फूट असून सुमारे नव्वद अंश कोनामध्ये उभा आहे. त्यामुळे सुळका चढणे शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस पाहणारा असतो. सोबती ट्रेकर कुलदीप चरवड आणि पॉईंट ब्रेक अ‍ॅड व्हेंचर टीमचे गिर्यारोहक चेतन शिंदे, राजश्री चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वाणरलिंगी उर्फ खडा पारसी सुळका सर करण्याची मोहिम फत्ते झाली आहे. त्यांचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.

Vanarlingi Khada Parsi Sulka
वाळव्याच्या कुस्ती मैदानात सातारच्या भगतनं हरियाणा केसरी गुलियाला चारली धूळ; दीड मिनिटांत झोळी डावावर केलं चितपट

तीन तासांच्या पायपीटीनंतर

या सुळक्याच्या पायथ्याशी पोहचण्यासाठी वांद्रे गावातून सुमारे तीन तासांची पायपीट केल्याने काहीशी दमछाक झाली होती. त्यानंतर, प्रत्यक्ष मोहिमेला सुरूवात झाल्यानंत सातत्याने प्रतिकूल वातावरण आणि स्थितीशी सामना करावा लागला. अशा स्थितीतही यापूर्वी गडकिल्ले आणि उभे सुळके सर केल्याचा गाठीशी असलेला अनुभव आणि नियमित सराव याच्या जोरावर प्रथमेश यांनी सुळका सर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com