esakal | सरकारच्या केवळ घोषणाच, "ते' 25 कोटी गेले कुठे?;  प्रवीण दरेकर यांचा सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

Pravin Darekar Comment On 25 Cores Compensation Sindhudurg Marathi News

श्री. दरेकर म्हणाले, ""सिंधुदुर्गात चक्रीवादळ येऊन गेले. याठिकाणी झालेल्या नुकसानीबाबत राज्य शासनाने 25 कोटी रुपये जाहीर केले होते; मात्र फक्त 37 लाख आले.

सरकारच्या केवळ घोषणाच, "ते' 25 कोटी गेले कुठे?;  प्रवीण दरेकर यांचा सवाल

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कुडाळ ( सिंधुदुर्ग ) - जिल्ह्यात चक्रीवादळ झाले, त्यावेळी राज्य शासनाने जाहीर केलेले 25 कोटी गेले कुठे? प्रशासनाकडून माहिती घेतली असता फक्त 37 लाख आले. शेतकऱ्यांना बांधावर बियाणे, खते मिळतील हे सुद्धा जाहीर केलेले धोरण फसवे निघाले. केवळ घोषणाबाजी करण्यापलीकडे या सरकारने काहीच केले नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, लवकरच भाजप पक्ष कोकणात एक नंबरचा ठरणार आहे, असे सूतोवाचही दिले. 

विरोधी पक्षनेते श्री. दरेकर यांनी आज एमआयडीसी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी पक्षाचे नेते तथा आमदार प्रसाद लाड, माजी आमदार प्रमोद जठार, भाजप तालुकाध्यक्ष विनायक राणे, राजू राऊळ आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. दरेकर म्हणाले, ""सिंधुदुर्गात चक्रीवादळ येऊन गेले. याठिकाणी झालेल्या नुकसानीबाबत राज्य शासनाने 25 कोटी रुपये जाहीर केले होते; मात्र फक्त 37 लाख आले. शेतकऱ्यांना बांधावर बियाणे, खते मिळतील असे धोरण या शासनाने जाहीर केले होते. ही यंत्रणाही तळागाळात पोहोचलीच नाही. राज्य शासनाने जाहीर केलेल्या घोषणा फसव्या ठरलेल्या आहेत.'' 

ते म्हणाले, ""कोरोना संकट असताना मी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलो, त्यावेळी स्वॅब मशिन सेंटरची घोषणा केली. तेव्हा हे सेंटर आम्ही सुरू करणार, या भीतीने या सरकारने सुरू केले. तीच परिस्थिती सिंधुदुर्गात झाली; मात्र आम्ही पाच आमदार एकत्र येऊन लवकरच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजमध्ये दुसरे स्वॅब मशिन सेंटर उपलब्ध करणार. त्याचे उद्‌घाटन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या व्हर्च्युअल देशव्यापी रॅलीला सुरुवात झाली असून, देशात नावीन्यपूर्ण ठरणार आहे. जिल्ह्यात 58 ठिकाणी ही रॅली होणार असून, त्याचे परिपूर्ण नियोजन केले आहे.'' 

कोकणात लवकरच भाजप एक नंबर 
कोकणात भाजपची ताकद देण्यासाठी मुंबई, ठाणे येथील सर्व आमदारांची फौज कोकणाकडे लक्ष देण्यासाठी लावणार आहे. लवकरच कोकणात भाजप मजबूत करण्यासाठी एक नंबर बनविण्यासाठी नजीकच्या काळात निश्‍चितच प्रयत्न केला जाईल, असे श्री. दरेकर यांनी सांगितले. 

loading image