Two Cannons Weighing 350 400 kg Retrieved from Avchitgad Fort
sakal
पाली - दुर्गम गडकिल्ल्यांचा इतिहास आणि त्यांचा अनमोल ठेवा जतन करण्यासाठी शिवशंभो प्रतिष्ठान रोहा व सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था यांनी अवचितगड येथे एक अत्यंत थरारक आणि कौशल्याने परिपूर्ण अशी संयुक्त मोहीम शनिवारी (ता. 20) यशस्वीपणे पार पाडली आहे. या मोहिमेअंतर्गत गडाच्या अवघड दरीतून दोन ऐतिहासिक तोफांना सुरक्षितपणे वर आणून गडावर पुन्हा स्थापित करण्यात आले.