भाजपचे शिष्टमंडळ धडकले थेट महावितरणवर ; महावितरणच्या अधिकार्‍यांनी दिले असे आश्‍वासन....

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

व्यावसायिक वीज बिल दुरुस्त करून देणार

व्यक्तीगत बिलांसाठी 3 हप्त्यांची मुदत
वीज कनेक्शन तोडणार नाही

रत्नागिरी : कोरोना लॉकडाऊन काळात आलेल्या वीजबिलांबाबत सर्व ग्राहकांना समस्या आहेत. याविरोधात आज रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ महावितरणवर धडकले. व्यावसायिक वीज बिलांची दुरुस्ती करून देणार, व्यक्तिगत बिले भरण्यासाठी 3 हप्त्यांची मुदत आणि बिलांबाबत शंका निरसनासाठी व्यवस्था आणि कोणाचेही वीज कनेक्शन तोडणार नाही, असे आश्‍वासन महावितरणच्या अधिकार्‍यांनी दिले.

मोठ्या रक्कमांची आलेली वीज बिले हा चिंतेचा विषय होता. अनेकांच्या तक्रारी घेऊन आज सकाळी भाजपचे शिष्टमंडळ धडकले. अधिकारी श्री. बेले, श्री. चव्हाण व श्री. पळसुलेदेसाई यांच्याशी चर्चा झाली. त्या वेळी श्री. बेले यांनी व्यावसायिक बिले दुरुस्त करून नव्याने देण्यात येतील. आता आलेली ही बिले भरणे आवश्यक नाही. व्यक्तिगत ग्राहकांची बिलाबद्दल शंका असेल तर त्याचे निरसन करू. व्यक्तिगत बिल भरण्यासाठी 3 हप्त्यांची मुदत दिली जाईल. सद्यस्थितीत कोणाचेही वीज कनेक्शन तोडणार नाही, असे स्पष्ट आश्वासन दिले.

हेही वाचा- अशी नाकाबंदी गुहागरकर पुन्हा अनुभवणार : लॉकडाऊनसाठी गुहागर तालुक्‍यात होणार कठोर कार्यवाही -

भाजप; महावितरणवर शिष्टमंडळाची धडक

याबाबत अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले, जनतेवर पडलेला अतिरिक्त बोजा कमी करता आला. त्यामुळे गोंधळ, साशंकतेचे वातावरण शांत होईल. बिलांसंदर्भातील विषय आक्रमकपणे मुद्देसूदपणे मांडून अधिकार्‍यांना माहिती देऊन चर्चा झाली. त्यानंतर ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय मिळाला.

हेही वाचा-विवाह झाले रद्द ;  दुसरा मुहूर्त शोधण्याची लागली घाई का ते वाचा..... 

शंका निरसनाची व्यवस्था

काल विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना वीज बिल प्रश्‍नी लक्ष घालण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार भाजपा कार्यकर्ते आज महावितरण कार्यालयात गेले होते. अ‍ॅड. दीपक पटवर्धन, सचिन वहाळकर, राजेश सावंत, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, शहराध्यक्ष सचिन करमरकर, नगरसेवक राजेश तोडणकर, उमेश कुलकर्णी, नगरसेविका सौ. सुप्रिया रसाळ, सौ. मानसी करमरकर, सौ. ऐश्‍वर्या जठार आदी या वेळी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: President Adv A delegation led by Deepak Patwardhan attacked MSEDCL.