esakal | भ्रष्टाचार असेल तर उघड करा : संजू परब
sakal

बोलून बातमी शोधा

press conference sanju parab sawantwadi konkan sindhudurg

आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुका प्रवक्ते केतन आजगावकर, पालिका क्रीडा व आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते. सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून उदय सामंत अकार्यक्षम आहेत.

भ्रष्टाचार असेल तर उघड करा : संजू परब

sakal_logo
By
रुपेश हिराप

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - जिल्ह्याचे पालकमंत्री पूर्णतः अकार्यक्षम असून त्यांनी जिल्हावासीयांचा अपेक्षाभंग केला आहे, अशी टीका भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे केली. जिल्हा परिषदेमध्ये शाळा दुरुस्तीच्या निधीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना जिल्हाध्यक्ष करत असतील तर तेव्हा आणि आताही शिवसेनेचाच पालकमंत्री असताना तुम्ही अद्यापही गप्प का? तो भ्रष्टाचार उघडकीस का आणला नाही? असा प्रश्‍नही परब यांनी उपस्थित केला. 

आज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुका प्रवक्ते केतन आजगावकर, पालिका क्रीडा व आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते. सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून उदय सामंत अकार्यक्षम आहेत. याबाबत भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी टीका केली होती; मात्र याला शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पडते व जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब यांनी प्रत्युत्तर दिले होते. त्यांनी तेली यांच्यावर टीका करून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शाळा दुरुस्तीच्या निधीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोपही केला होता. याला आज श्री. परब यांनी प्रत्युत्तर दिले. 

परब म्हणाले, ""जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शाळा दुरुस्तीच्या निधीमध्ये भ्रष्टाचार झाला आहे तर जिल्हाध्यक्ष पडते व त्यांचे पदाधिकारी गप्प का? त्यावेळीही शिवसेनेचे पालकमंत्री होते आणि आताही शिवसेनेचे पालकमंत्री आहेत, त्यांनी हा भ्रष्टाचार उघड का केला नाही? त्यामुळे पडते यांनी उगाच वायफळ बडबड करू नये. नगरसेवक सुशांत नाईक यांची जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यावर बोलण्याइतकी राजकीय उंची नाही. त्यांनी आधी आपली राजकीय उंची वाढवावी आणि नंतरच त्यांच्यावर तोंडसुख घ्यावे.'' 

परब पुढे मिळाले, ""जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपला घाम फुटला, असे पडते यांनी म्हटले होते; मात्र घाम फक्त पडते यांनाच येतो हे संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे. सावंतवाडी सभापती निवडीतही घाम काढण्याची भाषा त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती; पण भाजपचा सभापती निवडून आल्यानंतर त्यांच्याच पदाधिकाऱ्यांना घाम आल्याने ते त्या ठिकाणावरुन निघून गेले. 
जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी जो राजीनामा दिला त्याचा खुलासा त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांचा पक्षावर कुठलाही रोष नाही. कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज होता तो दूर झाला आहे. त्यामुळे तो विषय पुन्हा येणार नाही.'' 

जिल्ह्यात भाजप एकसंघ 
परब म्हणाले, की आज शिवसेनेचे जिल्ह्यातील वातावरण लक्षात घेता कणकवलीमध्ये त्यांच्या पक्षाचे तीन-तीन कार्यालये आहेत. सावंतवाडीतही दोन कार्यालये आहेत. येथे आमदार दीपक केसरकर गट व खासदार विनायक राऊत गट असे गट पाहायला मिळतात. त्यामानाने भाजप जिल्ह्यात एकसंघ आहे. त्यामुळे त्यांनी आमची काळजी करू नये. 

संपादन - राहुल पाटील

loading image