लोंडोरीच्या मटनावर ताव मारून दिली ढेकर अन् पोलिसांनी आवळल्या मुसक्या 

prey londor ratnagiri police station
prey londor ratnagiri police station

रत्नागिरी - वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार वर्ग 1 मध्ये मोडणार्‍या लांडोर मोराची शिकार करणार्‍या दोघांना वन विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवारी (ता. 31) झरेवाडी (ता. रत्नागिरी) येथे करण्यात आली.

रत्नागिरी तालुक्यातील झरेवाडी येथे हरिश्चंद्र बाबु गोताड यांनी लांडोराची शिकार केल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. लांडोराच्या शिकारीसाठी एअर गनचा त्यांनी वापर केला. ही माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या परिक्षेत्र वन अधिकारी आणि कर्मचा-यांनी घटनास्थही धाव घेतली. झरेवाडीतील हरिश्चद्र बाबु गोताड (42), प्रभाकर जानु गोताड (48) यांच्या घरात एका खोलीमध्ये लांडोरा पक्षाच्या मांसाचे तुकडे करून शिजवल्याचे लक्षात आले. वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी जाईपर्यंत संबंधितांनी लांडोराच्या मांसावर ताव मारलेला होता. उर्वरित मांस त्यांनी घरातील फ्रिजमध्ये ठेवलेले होते. तसेच हरिश्‍चंद्र गोताड यांच्या घराच्या परिसरात लांडोराची पिसे आणि टाकावू अवयव अर्धवट जळलेल्या अवस्थेत आढळून आले. त्या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.


वन विभागाच्या पथकाने हरिश्चंद्र गोताड आणि प्रभाकर गोताड यांना ताब्यात घेतले आहे. तसेच संशयितांकडील एअर गन आणि मृत लांडोर मोराची पिसे, अर्धवट जळलेल्या अवस्थेतील अवयव यासह मांसही ताब्यात घेतले. दोघांकडे चौकशी केल्यानंतर गुन्हा कबुल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. लांडोराच्या शिकारीचा हा पहिलाच गुन्हा असल्याचे पुढे आले आहे. गेल्या काही दिवसात वन विभागाने लांजा, संगमेश्‍वर येथेही शिकार करणार्‍याविरोधात कडक कारवाई केली आहे.

झरेवाडीतील कारवाईमुळे भविष्यात संरक्षीत वन्यप्राण्यांच्या शिकारीला आळा बसण्यास मदत होणार आहे. ही कार्यवाही रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी श्रीमती प्रियंका लगड, वनपाल गौ. पि. कांबळे, महादेव गणपती पाटील, सागर पताडे यांनी केली. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये लांडोरा मोर हा वन्यप्राणी संरक्षण अनसची 1 मध्ये येतो.  त्याची शिकार केल्यास 3 ते 7 वर्षापर्यंत कारावास किंवा 10 हजार रुपये दंड होऊ शकतो. यामध्ये दंड आणि कारावास या दोन्हीही शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे असे वनविभागाकडून सांगण्यात आले.

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com