राजापूर : हापूस आंब्याच्या हंगामाची (Hapus Mango Season) वाटचाल अंतिम टप्प्याकडे सुरू झाली आहे. सध्या हापूसचे दर घसरले असून, बाजारपेठेमध्ये हापूस आंबा पाठविणे आर्थिकदृष्ट्या परवडेनासे झाले आहे; मात्र बागायतदारांना कॅनिंगला मिळणाऱ्या दराने चांगला हात दिला आहे. कॅनिंगचे दर समाधानकारक असले तरीही आंबाच नसल्यामुळे अडचण येत आहे. प्रतिकूल हवामानामुळे हापूसचे उत्पादन २५ टक्क्यांपर्यंत घटले आहे.