esakal | प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइनच! शिक्षण विभागाचा आदेश: सुगम, दुर्गम भागातील यादी नवीन निकषानुसार 
sakal

बोलून बातमी शोधा

Primary teacher transfer online education marathi news kokan

याद्या प्रसिद्ध केल्यानंतर शिक्षकांकडून बदलीसाठी पसंतीक्रम घेतला जाईल. बदली प्रक्रिया सहा टप्प्यात राबविली जाईल.

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइनच! शिक्षण विभागाचा आदेश: सुगम, दुर्गम भागातील यादी नवीन निकषानुसार 

sakal_logo
By
राजेश कळंबटे

रत्नागिरी : कोरोनामुळे दोन वर्षे न होणारी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची बदली यंदा ऑनलाइन पद्धतीने करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. यासाठी जिल्ह्यातील सुगम, दुर्गम भागातील शाळांची यादी नवीन निकषानुसार तयार केली जाणार आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्या करण्याचे आदेश आज राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने दिले आहेत. यासाठी सुधारित धोरण निश्‍चित केले आहे. 31 मे अखेर ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेच्या गट क व गट ड च्या कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्याबाबत धोरण निश्‍चित केले होते. त्यानुसार शिक्षकांच्या बदल्या केल्या जात होत्या. परंतु शिक्षकांची मोठी संख्या व कामाचे भिन्न स्वरूप लक्षात घेऊन सरकारने यात बदल केला आहे. 

आता अवघड क्षेत्रात तीन वर्ष सेवा केलेल्या शिक्षक बदलीसाठी पात्र ठरणार आहेत. विविध आजारांनी त्रस्त असणाऱ्या शिक्षकांचा विशेष संवर्ग शिक्षक भाग एकमध्ये समावेश केला आहे. व्याधीग्रस्त शिक्षकांच्या जोडीदारांचा यात समावेश केला आहे. पती-पत्नी एकत्रीकरणाचा संवर्ग दोनमध्ये समावेश आहे. सलग दहा अथवा पाच वर्षे सेवा झालेले शिक्षकच नव्या धोरणात बदलीस पात्र ठरणार आहेत. रिक्त जागा भरण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. 

हेही वाचा- Covid 19 Update: सावंतवाडीत आउट ऑफ स्टॉक: लसीकरण बंद

याद्या प्रसिद्ध केल्यानंतर शिक्षकांकडून बदलीसाठी पसंतीक्रम घेतला जाईल. बदली प्रक्रिया सहा टप्प्यात राबविली जाईल. बदलीच्या ठिकाणी शिक्षक रुजू होत नसेल तर अशा शिक्षकाविरुद्ध कारवाई करण्यात येईल. बदली प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन राहणार आहे. राजकीय हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. बदली गैरसोयीची असेल तर त्यासाठी समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीने दिलेल्या निर्णयाने समाधान न झाल्यास संबंधित शिक्षकास विभागीय आयुक्तांकडे अपिल करण्याची मुभा आहे.

दुर्गमचे निकष बदलले
दुर्गम शाळा नवीन निकषानुसार ठरवण्यात येणार आहे. सातपैकी तीन निकष पूर्ण करणाऱ्या शाळा दुर्गममध्ये ठेवल्या जातील. नक्षलग्रस्त क्षेत्रात असणारे गाव, 2 हजार मिमीपेक्षा अधिक पाऊस पडणारे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे तुटणारे गावे, वन्यप्राण्यांचा उपद्रव असलेले, वाहतूक सुविधांचा अभाव असलेले, डोंगरी भाग प्रदेश म्हणून जाहीर केलेले, राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून 10 किमीपेक्षा अधिक दूर असलेले गाव, दोन वर्षांपूर्वी केलेल्या यादीमध्ये 950 हून अधिक शाळा दुर्गममध्ये होत्या. 

संपादन- अर्चना बनगे

loading image