रत्नागिरीतील खुल्या कारागृहातून कैद्याचे पलायन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

रत्नागिरी - येथील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणार्‍या कैद्याने पलायन केले. मंगळवारी (ता. 11) दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली असून कैद्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

रत्नागिरी - येथील खुल्या कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगणार्‍या कैद्याने पलायन केले. मंगळवारी (ता. 11) दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली असून कैद्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खुल्या कारागृहात रूपेश तुकाराम कुंभार हा जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी होता. खुले कारागृह केल्यामुळे काही एकरमध्ये पाले-भाजीचा फुलविल्या आहेत. त्यासाठी शिक्षेचे काही महिने राहिलेल्या पक्क्या कैद्यांना शेतीच्या कामासाठी बोलविण्यात आले होते. जेवढे महिने शेतीचे प्रमाणिक काम करेल तवढे शिक्षेतील महिने कमी केले जातात. म्हणून कैदी शेतीच्या कामासाठी पोलिस बंदोबस्तात राबतात. खुल्या कारागृहातील कैदी क्र. 10 रूपेश कुंभार हा काम करत होता. शौचालयाला जातो, असे सांगून त्याने तेथून पोबारा केला. 

कैदी पळून गेल्याचे कळताच रत्नागिरी विशेष कारागृहातील सुरक्षा रक्षकांची त्रेधातिरपीट उडाली. त्यांनी धावाधाव सुरू केली. पण तोपर्यंत रूपेश हा सर्वांच्या हातावर तुरी देऊन निसटला होता. कारागृहातील कर्मचारी रमाकांत यादव यांनी कैदी पळून गेल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दिली. तक्रारीवरून पळून गेलेल्या कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणामुळे रत्नागिरीच्या खुल्या कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वी देखील अशा दोन घटना घडल्या होत्या. तरी देखील सुरक्षा व्यवस्था एवढी ढिला का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prisoner escape from open jail in Ratnagiri