esakal | वाली नाही कुणी, कोरोनाने ग्रासले, आता तुम्हीही लुटा !
sakal

बोलून बातमी शोधा

private vehicles or traveller charge extra charges from konkan people who going to mumbai

खासगी ट्रॅव्हल्सवाले प्रत्येकी १८०० रुपये तिकीट दर आकारून चाकरमान्यांची खुलेआम लूट करीत आहेत.

वाली नाही कुणी, कोरोनाने ग्रासले, आता तुम्हीही लुटा !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्या चाकरमान्यांनी परतीचा प्रवास सुरू केला आहे. खासगी ट्रॅव्हल्सवाले प्रत्येकी १८०० रुपये तिकीट दर आकारून चाकरमान्यांची खुलेआम लूट करीत आहेत. याकडे प्रशासनाची मात्र डोळेझाक सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुंबईतून आलेल्या चाकरमान्यांपैकी ७५ टक्के चाकरमानी आपली नोकरी आणि व्यवसाय टिकवण्यासाठी परतीच्या मार्गाला लागले आहेत. मात्र, कोरोनाचे संकट सुरू असताना चाकरमान्यांना लुटण्याचा धंदा सुरू आहे.

हेही वाचा - काजू खरेदी करताय ? मग ही बातमी वाचाच

सुरवातीला मुंबई येथून येण्यासाठी एसटीच्या बसेस नव्हत्या, पास काढून यावे लागत होते. कोणतीही वाहतूक व्यवस्था नसताना खासगी ट्रॅव्हल्स मात्र मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात येत होत्या. त्यावेळी पास काढण्यासह तिकिटामागे हजारो रुपये घेतले गेले. त्यावेळीही चाकमान्यांसाठी अडचणीचे होते. एसटीने ग्रुप बुकिंगची व्यवस्था केली तरी आरामदायी प्रवासासाठी लोकांनी खासगी ट्रॅव्हल्सला पसंती दिली.

खासगी ट्रॅव्हल्सचा आधार घेत चाकरमानी पुन्हा मुंबईकडे निघाले आहेत. जिल्ह्याच्या सीमा बंद असताना ट्रॅव्हल्सची वाहतूक सुरू होती. कोरोनाच्या प्रादुर्भावात किती दिवस गावी राहणार, असे म्हणत आधीच आर्थिक संकट कोसळलेल्या चाकरमान्यांनी मुंबईत परतण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु चाकरमान्यांच्या होणाऱ्या लुटीवर निर्बंध आणणे आवश्‍यक आहे.

हेही वाचा -  हे गाव चालविण्याची जबाबदारी दरवर्षी मिळते तिघांना; इथे आजही कबुलायतदार गावकर व्यवस्था...

"चाकरमान्यांकडून भरमसाट तिकीट घेतले जात असताना ट्रॅव्हल्सचालकांवर कोणाचाही अंकुश नाही. खासगी ट्रॅव्हल्सचालकांकडून लूट सुरू आहे. ट्रॅव्हल्सवाले परमिट व प्रत्येक प्रवाशाचा विमा काढतात का, याची तपासणी प्रशासनाने करायला हवी."

- यश गोखले, चिपळूण

loading image