
कै.राजाराम मराठे कृषी महाविद्यालयात 'धिंगरी अळंबीचे' यशस्वी उत्पादन
सिंधुदुर्ग : फोंडाघाट येथील कै.राजाराम मराठे कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्ष कृषी पदवीच्या विद्यार्थ्यांनी 'प्रयोगातून शिक्षण ' या उपक्रमांतर्गत धिंगरी अळंबीचे' यशस्वी उत्पादन घेतले आहे. विद्यार्थ्यांनी हा प्रयोग यशस्वी करत 'प्ल्यूरोट्स' जातीच्या अळंबीचे उत्पादन घेतले. या विद्यार्थ्यांनी अळंबीचे यशस्वी उत्पादन घेऊन कोकणातील हवामान हे धिंगरी अळंबीच्या उत्पादनास पोषक असल्याचे दाखवून दिले आहे. (Successful Production of 'Mushroom' at Late Rajaram Marathe Agricultural College, Phondaghat, Sindhudurg)
हेही वाचा: लव्ही येथे ५०० विद्यार्थी बनले संगणक साक्षर
फोंडाघाट येथील कै.राजाराम मराठे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यानी 'प्ल्यूरोट्स' जातीच्या अळंबीचे यशस्वी उत्पादन घेऊन कोकणातील हवामान हे धिंगरी अळंबीच्या उत्पादनास पोषक असल्याचे दाखवून दिले आहे. अळंबी आहारामध्ये घेतल्यास त्यातून अधिक पौष्टीक घटक मिळतात, तसेच मधुमेह, ह्दयरोगावरही त्याचा उपयोग होतो.
अळंबी एक प्रकारची बुरशी आहे. अळंबीचं उत्पादन घेण्यासाठी हवेतील आर्द्रता व तापमान नियंत्रित करून निर्जंतुक केलेल्या भाताचा पेंढ्यावर बीज टाकलं जाते. अळंबीच्या उत्पादनासाठी फार मोठी गुंतवणूक करावी लागत नाही. ग्रामीण भागातील महिला बचतगट हा व्यवसाय सहजपणे करू शकतात. यामाध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होवू शकते.
हेही वाचा: आगामी काळात तापमानात होणार घट; मराठवाडा कृषी विद्यापीठाचा अंदाज
हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी विद्यार्थांना प्राध्यापक ओगले सर, सहाय्यक मर्गज सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पांडुरंग मोहिते सर तसेच पेडणेकर सर, गोंधळी सर, प्रा.गवळी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
Web Title: Production Of Mushroom At Late Rajaram Marathe Agricultural College
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..