मिर्‍या बंधार्‍याचे दुखणे होणार नाहीसे ; ‘नरीमन’च्या धर्तीवर प्रकल्प अहवाल तयार

Project Report Preparation of Mirya Dam ratnagiri
Project Report Preparation of Mirya Dam ratnagiri

रत्नागिरी - मुंबईच्या नरीमन पॉइंटच्या धर्तीवर मिर्‍या येथे बांधण्यात येणार्‍या 190 कोटीच्या पक्क्या धूप प्रतिबंधक बंधार्‍याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार झाला आहे. मोनार्च या कन्सल्टंट कंपनीने केलेल्या या डीपीआरचे लवकरच प्रेझेंटेशन होणार आहे. सूचना, हरकतीचा विचार करून डीपीआर फायनल झाल्यानंतर शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. सीआरझेडचा नाहरकत मिळवून मे 2021 पर्यंत कामाची वर्क ऑर्डर देण्याच्या हालचाली पत्तन विभागाच्या आहेत. 

मिर्‍या येथील काही गावांचे संरक्षण सुमारे साडे तीन किमीचा मिर्‍या धुपप्रतिबंधक बंधारा करतो. मिर्‍या बंधार्‍याचे दुखणे गेली अनेकवर्षे कायम आहे. दरवर्षी मिर्‍यावासियांनासाठी उधाणाची भरती धोक्याची ठरते. आता रहिवाशांच्या सात-बारा उतारावर समुद्र आला आहे. या परिसरात कामयस्वरूपी पक्का बंधारा व्हावा यासाठी मिर्‍यावासीयांनी आंदोलन केले. त्याला यश आले आणि शासनाने दखल घेत 190 कोटीच्या पक्क्या धूपप्रतिबंधक बंधार्‍याच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजूरी दिली. 


मिर्‍या धूप प्रतिबंधक बंधार्‍याचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम पुणे येथील मोनार्च कन्सल्टन्सीकडे देण्यात आले होते. काही महिनयांपूर्वी या कंनीचे तज्ज्ञ रत्नागिरी येऊ गेले. मिर्‍या धूप प्रतिबंधक बंधार्‍याचा सविस्तर अहवाल 1 महिन्यापूर्वीच पूर्ण झाला आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल झाल्याने त्यात कोणते बदल आवश्यक  आहेत का किंवा अन्य कार्यवाहीसाठी हा अहवाल पुणे, खडकवासला येथील सेंट्रक वॉटर अ‍ॅण्ड पॉवर रिसर्च स्टेशन (सीडब्ल्यूपीआरएस) कडे पाठविण्यात आला आहे. मिर्‍या किनारपट्टीवर धूप कशामुळे होते. ती थोपवण्यासाठी कायमस्वरूपी काय उपाययोजना कराव्यात याचा अभ्यास करण्यात आला आहे. मच्छीमारांचे प्रश्‍न आणि पर्यावरण विषयकही काही बाबींचा विचार अहवालात केला आहे. कॅबिनेट मंत्री उदय सामंत, खासदरा विनायक राऊत, स्थानिक ग्रामस्थ, अधिकारी आदींपुढे पंधरा दिवसात याचे प्रेझेंटेशन होणार आहे. 


मे 2021 पर्यंत वर्कऑर्डर देण्याचा प्रयत्न

नरीमल पॉईंटच्या धर्तीवर मिर्‍याचा बंधारा होणार आहे. शुक्रवारी मोनार्च कंपनीने डीपीआर सादर केला. प्रेझेंटेशन घेऊन काही बदल आदीचा विचार करून अंतिम अहवाल मंजूरीसाठी शासनाकडे पाठविला जाणार आहे. त्यानंतर सीआरझेडची मंजूरी महत्त्वाची आहे. या सर्व प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून मे 2021 पर्यंत मिर्‍या बंधार्‍याच्या कामाची वर्क ऑर्डर देण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू आहेत, अशी माहिती पत्तन अभियंता एस. ए. चौधरी यांनी दिली. 


संपादन- धनाजी सुर्वे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com