तिलारीचा पाणीपुरवठा अखेर पूर्ववत ; गोव्याला मोठा दिलासा

project of tillari and the water supply lastly start in sindhudurg
project of tillari and the water supply lastly start in sindhudurg

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : अखेर 'तिलारी' डाव्या कालव्यातून पाईपद्‌वारे गोव्याला आजपासून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. तो कालवा सोमवारी (ता. 25) फुटला होता. गोवा आणि दोडामार्गला असलेली पाण्याची गरज ओळखून केवळ 12 दिवसांत कालवा दुरुस्त करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला. त्यासाठी प्रकल्पाधिकारी बाळासाहेब आसगेकर आणि पाटबंधारेच्या यांत्रिक विभागाने मेहनत घेतली.
 
गोव्याला पाणी देण्यासाठी तिलारी प्रकल्पाधिकाऱ्यांनी कालवा फुटलेल्या ठिकाणी पाईप टाकून पाणी वाहून नेण्यासाठी जोरदार काम सुरू केले होते. खानयाळे येथे तिलारीचा डावा कालवा फुटल्याने गोव्याला जाणारा पाणीपुरवठा बंद झाला होता. तिलारीचे पाणी गोवेकर पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापरतात. कालवा फुटल्याने त्यांना कधी पाणी मिळेल याची शाश्‍वती नव्हती. त्यामुळे गोवा सरकारने महाराष्ट्र सरकारवर पाण्यासाठी दबाव वाढवला होता. तिलारी प्रकल्प गोवा आणि महाराष्ट्र सरकारचा संयुक्त प्रकल्प आहे. त्यात गोव्याचा वाटा 74 टक्के आहे. त्यामुळे त्यांना पाणी देण्यासाठी तातडीने उपाय करणे आवश्‍यक होते. 

तिलारी प्रकल्पाधिकाऱ्यांकडून वेगाने काम सुरू होते. कालवा फुटलेल्या जागी पाईप घालून पाणी पाईपमधून पुढे सोडण्यात आले. तूर्त खालीच्या रांगेतील पाईपलाईनमधून पाणी सोडण्यात आले, तर मागाहून वरील रांगेतील पाईपलाईनमधून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे दोडामार्ग व गोव्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

तूर्त 10 क्‍युमेक्‍स पाणी सोडले 

कालव्यातून दररोज 14 क्‍युसेक्‍स पाणी सोडले जाते. कालवा फुटलेल्या ठिकाणी पाईप टाकून त्यातून पाणी सोडण्यात आले. पहिल्याच दिवशी आज 10 क्‍युसेक्‍स पाणी सोडण्यात आले. टप्प्याटप्प्याने चौदा क्‍युसेक्‍स पाणी त्या कालव्यातून सोडण्यात येणार आहे, अशी माहिती आसगेकर यांनी दिली. 


...तर वेळ लागला असता 

शासनाच्या यांत्रिकी विभागाने कालवा फुटलेल्या ठिकाणी लोखंडी पाईप टाकून पाणी पुढे नेण्याची शक्कल लढवल्याने लवकरात लवकर पाणी सुरू झाले आणि शेती बागायती जगल्या. ते काम खासगी ठेकेदाराने केले असते, तर मागच्याप्रमाणे मोठा कालावधी लागला असता.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com