दाभोळ-दापोलीत सायकल फेरीतून जनजागृती

दाभोळ-दापोलीत सायकल फेरीतून जनजागृती

-rat2p34.jpg
87377
दापोली ः सायकल फेरीत सहभागी सायकलिंग क्लबचे सदस्य.

दापोलीत सायकल फेरीतून
पर्यावरण संवर्धन जनजागृती

सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. ३ ः दरवर्षी ३ जून जागतिक सायकल दिवस आणि ५ जून जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. मनुष्य आणि पर्यावरण यांचे अतूट नाते आहे. निसर्गाशिवाय मनुष्यजीवन शक्य नाही. सायकल चालवणे केवळ पर्यावरणासाठीच चांगले नाही, तर आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. सायकलचे महत्त्व व आरोग्यादायी फायदे समजून सांगण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धन जनजागृतीसाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवारी (ता. २) सायकल फेरी काढण्यात आली.
या फेरीचा मार्ग आझाद मैदान, दापोली, उदयनगर, लष्करवाडी, आनंदनगर, बर्वेआळी, जालगाव, पांगारवाडी, नर्सरी रोड, आझाद मैदान असा ७ किमीचा होता. यामध्ये सर्व वयोगटांतील नागरिक सायकल चालवत सहभागी झाले होते. या फेरीदरम्यान पर्यावरण अभ्यासक प्रशांत परांजपे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांनी राबवलेल्या पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन आदी अनेक उपक्रमांबद्दल माहिती जाणून घेण्यात आली. टाकाऊ कचऱ्यापासून बनवलेल्या शोभेच्या वस्तू पाहिल्या. स्वच्छतेची सुरुवात आपल्या स्वतःच्या घरापासून करा, सर्व प्रकारचा सुका कचरा, संकलन केंद्रात जमा करा. ओल्या कचऱ्यांचे कम्पोस्ट खत करा आणि आपले घर, परिसर कचरामुक्त ठेवा, असे सर्वांना आवाहन करण्यात आले. सर्वांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली. या फेरीचे नियोजन करण्यात प्रशांत पालवणकर, अंबरीश गुरव, अमोद बुटाला, महेश्वरी विचारे, वैभवी सागवेकर आदींनी मोलाची भूमिका बजावली. दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com