हास्यगीता पुस्तकाचे प्रकाशन

हास्यगीता पुस्तकाचे प्रकाशन

फोटो ओळी
-rat४p७.jpg ः
२४M८७७५३
दापोली : हास्यगीता पुस्तकाचे प्रकाशन करताना मान्यवर.
--------------

सहस्रबुद्धेंच्या ‘हास्यगीता’ पुस्तकाचे प्रकाशन

दाभोळ ः दापोली अर्बन बँकेचे माजी अधिकारी व गिम्हवणे येथील रहिवासी आत्माराम (नाना) सहस्रबुद्धे यांच्या हास्यगीता या पुस्तकाचे प्रकाशन दापोली येथे करण्यात आले. नाना सहस्रबुद्धे यांनी आपल्या विनोदी शैलीत विविध विषयांवर व्हॉटस अॅप ग्रुपवर लिहिलेल्या नात्यातल्या सहज गप्पांवरील मिश्कील लेखांच्या संकलनाचे हास्यगीता या नावाचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. कार्यक्रमाला अविनाश हळबे, दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष जयवंत जालगावकर, सुमंत जुवेकर, नाना सहस्रबुद्धे व त्यांच्या पत्नी अर्चना सहस्रबुद्धे उपस्थित होत्या. पुस्तक प्रकाशनाला समाजातील विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रकाश वैशंपायन यांनी तर आभार अभिजित सहस्रबुद्धे यांनी मानले.
----------
-rat४p८.jpg-
P२४M८७७५४
देवरूख ः मार्लेश्वर परिसरात स्वच्छता करणारे देवरूखचे कबड्डीपटू
--------------

कबड्डी खेळाडूंनी केले मार्लेश्वर स्वच्छ

साडवली ः देवरूखजवळील प्रसिद्ध मार्लेश्वर या पर्यटनस्थळी भाविक, पर्यटकांनी टाकलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे परिसर बकाल झाला होता. ही दूरवस्था पाहून देवरूख येथील फ्रेंडसर्कल हिंदवी कबड्डी संघातील खेळाडूंनी मार्लेश्वर येथे स्वच्छतामोहीम राबवली. प्लास्टिक रॅपर, बाटल्या, अन्य वस्तू गोळा केल्या. मार्लेश्वर धबधबा परिसर, कंरबेळी डोह, मंदिर परिसर, दुकाने या ठिकाणी दिवसभर मोहीम राबवली. संघातील १० कबड्डीपटूंनी यात सहभाग नोंदवला. भाविक व पर्यटक यांनी खरेतर कचरा इतरत्र न टाकता डस्टबिनमध्ये टाकायला हवा. देवस्थान कमिटी, मारळ ग्रामपंचायत व व्यापारीवर्गाने तशी सोय करणे गरजेचे आहे; मात्र तसे होताना दिसत नाही. मार्लेश्वर धारेश्वर धबधबा हा नदीचे रूप धारण करतो. या नदीत हा सगळा कचरा साचला जातो तसेच या ठिकाणी असणारे पशूपक्षी, वानरांना यापासून धोका होऊ शकतो. देवस्थान कमिटीने व व्यापारी, ग्रामपंचायत यांनी हे पर्यटनस्थळ स्वच्छतेकडे जागरूकतेने लक्ष दिले पाहिजे. देवरूखचे दक्ष नागरिक गणेश खामकर व इतर संघटनांनी दिलेले डस्टबिन गायब झालेले दिसत आहेत.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com