

Konkan Paddy Farming Faces Severe Crisis Due to Deficient Rainfall and El Niño Effect
Sakal
राजापूर : अल निनो वादळाच्या प्रभावामुळे यावर्षी अपेक्षापेक्षा कमी पाऊस पडला आहे. त्यामध्ये ऐन लावणीच्या हंगाम आणि त्यानंतर पीक फुलोर्यात येण्यापूर्वी भातशेतीला पाण्याची गरज होती. मात्र, नेमके याच कालावधीमध्ये पावसाने दांडी मारल्याने पुरेशा पाण्याअभावी भातशेती पिक अडचणीत आले आहे. पाण्याअभावी रोपे सुकण्यासह मरू लागली असून परिपक्व झालेल्या भाताच्या लोंबीमध्ये दाणे कमी अन् चिंब जादा’ अशी स्थिती आहे. काही भागामध्ये पिकाला लोंब्याच नाहीत, तर निमगरव्या आणि गरव्या (महान) भातशेतीच्या लोंबीमध्ये चिंब (पोचटपणा) जास्त राहण्याचा अंदाज आहे. एकंदरीत, अल निनो वादळाच्या प्रभावामुळे उन्हाळ्यामध्ये भीषण पाणीटंचाई, आंबा-काजू उत्पादन अन् उत्पन्नात घट या आलेल्या संकटानंतर आता भातशेतीही दुष्काळाच्या संकटात अडकली आहे.