Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

पाली-सुधागड एसटी बसस्थानकाला १४ कोटींचा पुनर्विकासाचा हात, तीन महिन्यांत भूमिपूजन; अत्याधुनिक सुविधा, प्रवाशांना दिलासा
Infrastructure Milestone: Transport Minister Pratap Sarnaik Approves ₹14 Crore for Pali Bus Depot

Infrastructure Milestone: Transport Minister Pratap Sarnaik Approves ₹14 Crore for Pali Bus Depot

Sakal

Updated on

पाली : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी (ता. 30) रोजी अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली येथील श्री बल्लाळेश्वराच्या दर्शनाने आपल्या तीन दिवसीय कोकण दौऱ्याची सुरुवात केली. मंत्री प्रताप सरनाईक यांनी पाली-सुधागड एसटी बसस्थानकाच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. बसस्थानकाच्या दुरवस्थेची गंभीर दखल घेत त्यांनी या स्थानकाच्या पुनर्विकासासाठी तब्बल १४ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली. तसेच येत्या तीन महिन्यांत या प्रकल्पाचे भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी ग्वाही देत मंत्री सरनाईक यांनी सुधागडसह संपूर्ण रायगडवासीयांना मोठा दिलासा दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com