पुणे ते झाराप कोकण रेल्वे आजपासून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

एक नजर

  • पुणे जंक्‍शन-झाराप-पुणे ही विशेष गाडी गुरुवारपासून धावणार.
  • सायंकाळी ६.४५ वाजता पुण्याहून सुटेल दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४० वाजता झारापला पोचेल.
  • परतीचा प्रवास झारापहून सकाळी ७.१० वाजता सुरू होईल. ती पुणे जंक्‍शनला त्याच दिवशी १०.५ वाजता पोचेल.
  • ही गाडी लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडल स्टेशनवर थांबणार. 

रत्नागिरी - उन्हाळी सुटीसाठी मुंबईकरच नव्हे, तर पुण्यातूनही मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात दाखल होतात. पुण्यातून कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेली गाडी एर्नाकुलमपर्यंत धावते. त्यामुळे परतीच्या पर्यटकांना त्या गाडीत जागा मिळविण्यासाठी चढाओढ करावी लागते. ती थांबविण्यासाठी पश्‍चिम रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर पुणे जंक्‍शन ते झाराप अशी गाडी गुरुवारपासून (ता. १८) सुरू केली आहे.

उन्हाळी सुटीसाठी कोकण रेल्वे मार्गावर अनेक फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने त्यांची घोषणा केली जात आहे; परंतु जादा गाड्यांचे आरक्षणंही फुल्ल होत आहेत. पुण्यातील अनेक लोक कोकणात फिरायला दाखल होतात.

पुणे जंक्‍शन-झाराप-पुणे ही विशेष गाडी गुरुवारपासून धावणार आहे. ती सायंकाळी ६.४५ वाजता पुण्याहून सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४० वाजता झारापला पोचेल. तिचा परतीचा प्रवास झारापहून शुक्रवारी (ता. १९) सकाळी ७.१० वाजता सुरू होईल. ती पुणे जंक्‍शनला त्याच दिवशी १०.५ वाजता पोचेल. ती गाडी लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडल स्टेशनवर थांबणार आहे. या गाडीला वीस डबे आहेत. त्यात टू टायर एसी १, थ्री टायर एसी ५, स्लिपर ८ डबे, सामान्य ४ तर एसएलआर २ डबे आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune to Zharap Konkan Railway from today