esakal | प्युरीफायर घोटाळाच्या चौकशीसाठी नवे अधिकारी
sakal

बोलून बातमी शोधा

प्युरीफायर घोटाळा

प्युरीफायर घोटाळाच्या चौकशीसाठी नवे अधिकारी

sakal_logo
By
नंदकुमार आयरे

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील प्युरिफायर घोटाळ्याची चौकशी आता रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे या चौकशीकडे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा: अखेर चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरलाच;पाहा व्हिडिओ

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने शाळांसाठी केलेले प्युरीफायर खरेदी वादात सापडली आहे. बाजारभावापेक्षा जास्त दराने ही खरेदी करण्यात आली आहे, अशी तक्रार शिवसेनेच्यावतीने करण्यात आली होती. शिवसेनेचे गटनेते नागेंद्र परब यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा खरेदी घोटाळा प्रशासनाच्या लक्षात आणून देऊन याबाबत चौकशी करावी, अशी मागणी केल्यावर ही चौकशी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांच्याकडे सोपवण्यात आली होती; मात्र जिल्हा परिषद प्रशासनाच्या या निर्णयाला शिवसेना सदस्यांनी कडाडून विरोध केला.

हेही वाचा: पक्ष प्रवेशाचे नाट्य म्हणजे मुख्यमंत्र्यांचा अपमान; BJP चा दावा

ज्याच्या सहीने ही खरेदी झाली, त्यांच्या खालील अधिकाऱ्याकडून चौकशी पारदर्शकपणे होण्यास शंका आहे. अशी हरकत शिवसेना सदस्यांनी घेतली आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून या घोटाळ्याची चौकशी करण्यात येऊ नये, अशी मागणी केली. याबाबत शिवसेना गटनेते यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले. त्यानुसार आता शिक्षण विभागातील प्युरिफायर खरेदी घोटाळ्याची चौकशी रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

loading image
go to top