Radhanagari Wildlife Sanctuary : मांजरखिंड ते काळम्मावाडी धरण मार्गावर खुललं निसर्गाचं सौंदर्य; झाडांवर रुबाबात वावरणारा 'शेकरू' कॅमेऱ्यात कैद

Shekru Spotted in Radhanagari Wildlife Sanctuary Forest : राधानगरी अभयारण्यातील मांजरखिंड ते काळम्मावाडी धरण मार्गावर महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू दिसला आहे.
Shekru sighting near Kalamwadi Dam

Shekru sighting near Kalamwadi Dam

esakal

Updated on: 

सरवडे : राधानगरी अभयारण्याच्या निसर्गसमृद्ध जंगलात महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेल्या शेकरूचे दर्शन घडल्याने निसर्गप्रेमींत आनंदाचे वातावरण आहे. मांजरखिंड ते काळम्मावाडी धरण मार्गावर जंगलभ्रमंती करत असताना प्रीतम पाटील (मोघर्डे) यांच्या निदर्शनास हा आकर्षक प्राणी आला. फांद्यांवर मुक्तपणे वावरणाऱ्या शेकरूचे छायाचित्र त्यांनी कॅमेऱ्यात (Indian giant squirrel in Kolhapur forest) टिपले.

Loading content, please wait...