esakal | वेंगुर्लेच्या सातेरी मंदिरात भाविकांनी अनुभवला किरणोत्सव...
sakal

बोलून बातमी शोधा

Radiation sateri  temple in vengurla kokan marathi news

अवघ्या काही मिनिटांसाठी सूर्यकिरण थेट देवीच्या आराशीवर आल्याचा क्षण याची देही, याची डोळा अनुभवता आला.

वेंगुर्लेच्या सातेरी मंदिरात भाविकांनी अनुभवला किरणोत्सव...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

 वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) : येथील श्रध्दास्थान व ग्रामदैवत श्री सातेरी मंदिरात आज सकाळी सूर्यनारायण थेट देवीच्या भेटीस येण्याचा अभूतपूर्व सोहळा उपस्थित भाविकांना अनुभवता आला. अवघ्या काही मिनिटांसाठी सूर्यकिरण थेट देवीच्या आराशीवर आल्याचा क्षण याची देही, याची डोळा अनुभवता आला.

हेही वाचा- तर जठारांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल....

दुर्मिळ योग : आणखी दोन दिवस योग
कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात असा क्षण भाविक अनुभवतात. तसाच क्षण आज येथील ग्रामदैवत श्री सातेरी मंदिरात घडून आला. आज सकाळी 7 ते 7.30 या कालावधीत सूर्यकिरण थेट मंदिरातील गाभार्‍यात देवीच्या भेटीला काही क्षणाला आल्याचे दिसून आले. यावेळी मंदिरातील मानकरी व भाविकांनी हा सोहळा अनुभवला. उद्या (ता.4) व परवाही असा सोहळा भाविकांना या वेळेतच अनुभवता येणार असल्याचे मंदिर व्यवस्थापनाकडून जाहीर करण्यात आले आहे.

loading image