esakal | तर जठारांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल....
sakal

बोलून बातमी शोधा

 sanjay padate press conference in oras kokan marathi news

नाणार रिफायनरी प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी रद्द केला आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी हा विषय संपलेला आहे; मात्र प्रमोद जठार हे भाडोत्री माणसे घेऊन या प्रकल्पाचे समर्थन करून जनतेची दिशाभुल करीत आहेत.

तर जठारांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल....

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी : नाणार रिफायनरी प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी रद्द केला आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी हा विषय संपलेला आहे; मात्र प्रमोद जठार हे भाडोत्री माणसे घेऊन या प्रकल्पाचे समर्थन करून जनतेची दिशाभुल करीत आहेत. राजापूर येथील डोंगरतिठा येथील नाणार समर्थनीय मेळाव्यात प्रमोद जठार यांनी खासदार राऊत यांच्याबाबत चप्पलीची भाषा वापरून केलेल्या चूकीच्या वक्तव्याचा शिवसेना जाहीर निषेध करीत आहे. जठारांनी आपले तोंड वेळीच आवरावे, अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईलने उत्तर देईल, असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते यानी ओरोस येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिला आहे.

हेही वाचा- विनायक राऊत समोर आलात तर पायातील चप्पल तोंडात मारू...

कोकण जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीने काल (ता.2) राजापूर येथील डोंगर तिठा येथे ग्रीथ रिफायनरी समर्थनार्थ मेळावा झाला. या मेळाव्यात माजी आमदार जठार यांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्याबाबत चप्पलीची भाषा वापरत वक्तव्य केले. या वक्तव्याचा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पडते यांनी पत्रकार परिषदेतून समाचार घेतला. जठारांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला. यावेळी शिवसेनेचे सोमा घाडीगावकर उपस्थित होते.

हेही वाचा- भयानक ! आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....

माजी मुख्यमंत्र्यांनी केला प्रकल्प रद्द

यावेळी श्री. पडते म्हणाले, “माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच नाणार येथील विनाशकारी प्रकल्प रद्द केला आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी नाणार रिफायनरी प्रकल्पाचा विषय संपलेला आहे. तेव्हा कोणीही शिवसैनिक या प्रकल्पाचे समर्थन करणार नाहीत. 1 मार्चला प्रकल्प नको म्हणून रत्नागिरी सांगवे येथे सभा झाली. या सभेत खासदार राऊत यांनी प्रकल्पाला समर्थन करणार्‍या शिवसैनिकाबाबत जे वक्तव्य केले व कारवाई केली हा त्याचा अधिकार आहे. जठारांचा तो विषय नाही. त्यामुळे त्यांनी दुसर्‍याच्या घरात डोकावण्याची गरज नाही. प्रकल्पाला समर्थन करणारे ते शिवसैनिक जठारांचे सोबती व जमिनीचे दलाल होते. म्हणून त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे. हा शिवसेनेचा अधिकार आहे. तेव्हा जठारांनी शिवसेनेच्या खासदारांवर बिनबुडाचे आरोप करू नयेत.”

हेही वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेनां नाणार रिफायनरी प्रकल्प हवा आहे ; भाजपच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

भाडोत्री माणसे घेऊन प्रकल्पाचे समर्थन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जनतेला नको असलेला विनाशकारी प्रकल्प नको आहे. त्यांनी तेव्हाही त्या प्रकल्पाचे समर्थन केलेले नाही; मात्र जठार त्यांच्या नातेवाईकांच्या तेथे जमिनी आहेत असे खोटे वक्तव्य करून जनतेची दिशाभूल करीत आहेत. भाडोत्री माणसे घेऊन जठार प्रकल्पाचे समर्थन करीत हा प्रकल्प होण्याचे स्वप्न पहात आहेत; मात्र हा प्रकल्प केव्हाच रद्द झाला आहे. तेव्हा जठारांनी आपले तोंड वेळीच बंद करावे. शिवसेनेच्या नेत्यांवरील बिनबुडाचे आरोप थांबवावेत अन्यथा शिवसेना त्यांना आपल्या स्टाईलने उत्तर देईल.”


 

loading image
go to top