राहुल पंडित राजीनामा देणार

राजेश शेळके
Sunday, 26 May 2019

रत्नागिरी - थेट जनतेतून निवडून दिलेल्या रत्नागिरी नगराध्यक्षपदासाठी लवकरच निवडणूक लागणार आहे. विद्यमान नगराध्यक्ष राहुल पंडित रजेवरून पुन्हा हजर होण्याच्या मनस्थितीत नाहीत. ते पदाचा राजीनामा देण्यावर ठाम आहेत. पक्षानेही राजीनामा घेऊन युती म्हणून नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी दर्शविल्याचे चित्र आहे. 

रत्नागिरी - थेट जनतेतून निवडून दिलेल्या रत्नागिरी नगराध्यक्षपदासाठी लवकरच निवडणूक लागणार आहे. विद्यमान नगराध्यक्ष राहुल पंडित रजेवरून पुन्हा हजर होण्याच्या मनस्थितीत नाहीत. ते पदाचा राजीनामा देण्यावर ठाम आहेत. पक्षानेही राजीनामा घेऊन युती म्हणून नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी दर्शविल्याचे चित्र आहे. 

पालिकेच्या निवडणुकीनंतर अडीच वर्षांनी राहुल पंडित यांनी राजीनामा द्यावा, असे पक्षांतर्गत धोरण निश्‍चित झाले होते. त्यानुसार त्यांनी अडीच वर्षांनंतर राजीनामा दिला. मात्र, पक्षाने तो मंजूर केला नाही. लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याने निवडणुकीला सामोरे जाण्यापेक्षा कायद्यातील तरतुदीनुसार श्री. पंडित यांना तीन महिने रजेवर पाठविण्याचा निर्णय 
शिवसेनेने घेतला. 

१२ जानेवारीला प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी यांनी पदभार घेतला. १२ एप्रिलला तीन महिन्यांची मुदत संपुष्टात आली आहे. बंड्या साळवी यांनी सेनेची मलीन झालेली प्रतिमा उजळण्याचा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीत शहरातही चांगले मताधिक्‍य मिळाल्याने युतीचा आत्मविश्‍वास वाढला आहे. पंडित यांचा राजीनामा घेऊन पुन्हा थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने तयारी केली. विद्यमान प्रभारी नगराध्यक्षच सेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असणार आहेत. युतीच्या पदाधिकाऱ्यांची याबाबत चर्चा झाली असून, त्या अनुषंगाने बांधणी सुरू केली.  

पदावर राहण्याची इच्छा नाही - राहुल पंडित
दरम्यान, पालिकेतील या घडामोडींबाबत राहुल पंडित यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की नगराध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास मी कधीच तयार आहे. पक्ष मला कधी आदेश देतोय, त्याची मी आतुरतेने वाट पाहतोय. मलाही त्या पदावर राहण्याची इच्छा नाही.

शेट्येंचा अडथळा दूर झाला
माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये हे नगराध्यक्षपदातील सेनेला मोठा अडसर होते. शहरातून कोणत्याही प्रभागातून निवडून येण्याची त्यांची ताकद होती. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. शिवसेनेचा अडीच वर्षांचा कारभार पाहता पुन्हा त्यांना जनतेने संधी दिली असती. मात्र, त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे सेनेचा मार्ग मोकळा झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Pandit in resigns mood