Colourful butterfly species found in Raigad district, where diverse natural habitats support rich butterfly biodiversity.
esakal
पाली: पश्चिम घाटाचा विस्तीर्ण पट्टा, मुबलक झाडेझुडपे, विस्तीर्ण निसर्गरम्य समुद्रकिनारा आणि कांदळवने या पोषक वातावरणामुळे रायगड जिल्ह्यात सध्या रंगीबेरंगी फुलपाखरांचा संचार वाढला आहे. जिल्ह्यात तब्बल १४७ प्रजातींचा मुक्त संचार पाहायला मिळत आहे. यात महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू 'ब्ल्यू मॉरमॉन' (राणी पाकोळी) आणि पश्चिम घाटातील सर्वात मोठे दुर्मिळ 'सदर्न बर्ड विंग' यांचाही समावेश आहे.