

Raigad Government Employees and Teachers Protest for Revised Pension Scheme
sakal
पाली : सरकारी निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती व राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या १८ लाख कर्मचारी शिक्षकांचा 11 नोव्हेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याकामी प्रशासकीय यंत्रणेच्या सहकार्यासाठी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कामासाठी व आचार संहिता च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत पुकारलेल्या बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय तूर्तास स्थगित करण्यात आला आहे.