

Dark clouds over Raigad
sakal
पाली : रब्बी हंगामाची सुरुवात साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होते आणि तो मार्च-एप्रिल महिन्यापर्यंत चालतो. जिल्ह्यात रब्बी हंगामात जवळपास साधारण बारा ते साडे पंधरा हजार हेक्टरवर कडधान्याचे पिक घेतले जाते. भात शेतीची सर्व कामे आटोपल्यावर शेतकरी राजा आपल्या शेतात कडधान्य लावतो. त्यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडते. मात्र लांबलेल्या पावसामुळे सध्या कडधान्य पिकास पूरक हवामान देखील नाही. आणि शेतजमीनीत पाणी साठले आहे.