Crime
Crimeesakal

Raigad : महिला रुग्णासोबत असभ्य वर्तन; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

तसेच, पीडित रुग्ण महिलेसोबतही अपमानस्पद वागणूक आणि अर्वाच्य भाषा वापरली.
Published on

Raigad - रसायनीतील रिस येथील रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेसोबत तेथील डॉक्टरांनी अपमानास्पद वागणूक आणि अर्वाच्य भाषा वापरली होती. याप्रकरणी डॉ. बंग यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी वासांबे मोहोपाडा आणि इतर बाजारपेठांत बुधवारी (ता. १२) बंद पाळण्यात आला. या वेळी वासांबे मोहोपाडा बाजारपेठेतून सर्वपक्षीयांनी रॅली काढली. दुपारी बारानंतर बंद शिथील करण्यात आला. दरम्यान डॉ. बंग यांच्याविरोधात रसायनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 Crime
Pune Crime : मोकाच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांना कर्नाटकातून अटक

रिस येथे राहणारी ३३ वर्षीय महिलेच्या तब्येतीत सुधारणा होत नसल्याने पीडितेचा भाऊ रेहान लांबतुरे यांनी डॉ. बंग यांच्याकडे शनिवारी विचारपूस केली. यावेळी मनात राग धरून डॉ. बंग यांनी शिवीगाळ व दमदाटी करून लांबतुरे यांना रुग्णालयाबाहेर काढले.

तसेच, पीडित रुग्ण महिलेसोबतही अपमानस्पद वागणूक आणि अर्वाच्य भाषा वापरली. रुग्णालयातून डिस्‍चार्ज दिल्यानंतर त्यांनी रसायनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

 Crime
Mumbai Crime : कॉलगर्ल घरी येत नाही म्हणून केली शिवीगाळ; 42 वर्षीय व्यक्तीची गळा चिरुन हत्या

दरम्यान डॉ. बंग यांच्यावर कारवाई करावी, याकरिता वासांबे मोहोपाडा, चांभार्ली, वावेघर परिसरात बंदचे आवाहन सर्व पक्ष, सामाजिक संघटना यांच्यातर्फे करण्यात आले होते. बुधवारी वासांबे मोहोपाडा येथे निदर्शने करण्यात आले.

यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. माजी सरपंच ताई पवार, काँग्रेसचे कृष्णा पारंगे, अनंत दळवी, सागर सुखदरे, संतोष चौधरी, राष्ट्रवादीचे संदीप मुंढे, अनिल पिंगळे, दत्तात्रेय जांभळे, शेकापचे जगदीश पवार, ठाकरे गटाचे संतोष पांगत, मंगेश पाटील आणि इतर पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com