Indian vultures spotted on Kolad Pune road
esakal
पाली (जि. रायगड) : रायगड जिल्ह्यात विपुल वनसंपदा आणि जैवविविधता आढळते. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे, वन्यजीवरक्षक सागर दहिंबेकर यांना शनिवारी (ता. 3) सुतारवाडी ते कुडली गावादरम्यान कोलाड-पुणे मार्गावर नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या अतिदुर्मिळ 'भारतीय गिधाडां'चे (Indian Vulture) दर्शन घडले (rare Indian vulture sighting near Sutarpadi) आहे.