

Migratory Birds Arrive in Raigad
esakal
पाली : थंडीच्या हंगामात हजारो किलोमीटरचा प्रवास करून विविध देशी व विदेशी स्थलांतरित पक्षी रायगड जिल्ह्यात दाखल होतात. मागील काही दिवसांपासून वातावरण अनुकूल झाले आहे. थंडीही चांगली पडू लागली असल्याने या स्थलांतरीत व स्थानिक पक्षांची रेलचेल सुरु झाली आहे. त्यामुळे पक्षी अभ्यासक, निरीक्षक व पर्यटक सुखावले आहेत. तसेच यामुळे पर्यटन वाढीला देखील चालना मिळत आहे.