Raigad News : पेणजवळ आढळला डमी बॉम्ब; परिसरात खळबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bomb Search Squad Latur
Raigad News : पेणजवळ आढळला डमी बॉम्ब; परिसरात खळबळ

Raigad News : पेणजवळ आढळला डमी बॉम्ब; परिसरात खळबळ

मुंबई गोवा महामार्गावर पेणच्या जवळपास एक संशयास्पद वस्तू आढळून आली होती. ही वस्तू म्हणजे एक डमी बॉम्ब असल्याचं आता समोर आलं आहे. चार तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर बॉम्ब शोधक पथकाला हा बॉम्ब निकामी करण्यात यश आलं आहे. नवी मुंबई आणि रायगड बॉम्ब शोधक पथकाने ही कामगिरी यशस्वी केली आहे.

भोगावती नदीच्या पुलाच्या खालच्या बाजूला जिलेटीन सारख्या कांड्या सापडल्या होत्या. संध्याकाळी नदीपात्रात गेलेल्या एका व्यक्तीला हे आढळून आलं होतं. त्यानंतर त्याने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर तातडीने पेण पोलिस तसंच मुंबई आणि रायगडमधील बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झालं. तपासानंतर ही वस्तू डमी बॉम्ब असल्याचं आढळून आलं.

दरम्यान, या सगळ्यामुळे या परिसरात तणावपूर्ण वातावरण होतं. चार तासाच्या प्रयत्नांनंतर हा डमी बॉम्ब निकामी करण्यात यश आलं. यामध्ये वायर्स आणि डिजिटल घड्याळांचा वापर केल्याचं आढळून आलं आहे.

टॅग्स :Raigad