raigad
raigadsakal

Raigad News : रोहा पालिकेची इमारत धोकादायक

स्लॅबला तडे, खांबाच्या सळ्याही गंजल्‍या

रोहा - चौदा वर्षांपूर्वी रोह्यातील नागरिकांच्या सेवेत लोकार्पण करण्यात आलेली नगरपालिकेच्या इमारतीची दुरवस्‍था झाली आहे. स्लॅबला ठिकठिकाणी तडे गेले असून गळती लागली आहे. अनेक पिलरचे प्लास्टर निखळले असून गंजलेल्‍या सळया बाहेर आल्या आहेत. स्लॅबवर झाडेझुडपे उगवली आहेत. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्‍याने नागरिक तसेच कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागते.

२००६ मध्ये पायाभरणी केलेल्या नगरपरिषद इमारतीचे बांधकाम २००९ मध्ये पूर्ण झाले. यासाठी जवळपास दोन कोटी ३० लाखांचा खर्च करण्यात आला होता. मात्र १४ वर्षांत इमारतीला तडे गेले आहेत. या इमारतीमध्ये नगरपालिका प्रशासकीय कार्यालय, महावितरणचे विभागीय कार्यालय व १९ व्यापारी गाळे आहेत. दररोज शेकडो नागरिक विविध कामांसाठी वर्दळ असते.

इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे अपेक्षित असताना, केवळ भेगा भरण्याचे तसेच पडलेल्‍या स्‍लॅबची डागडुजी करण्यात येत असल्‍याने याठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांनीही नाराजी व्यक्‍त केली आहे.

raigad
Chh. Sambhaji Nagar : पाणीपुरवठ्यातील विघ्न कायम;वीजपुरवठा खंडित झाल्याने पुरवठा पुन्हा विस्कळित

नगरपालिका कार्यालयात कर भरणा, विविध समस्‍या सोडवण्यासाठी अनेकजण निवेदन घेऊन येतात. इमारतीच्या दुरवस्‍थेमुळे एखादी दुर्घटना घडल्‍यास जबाबदार कोण, असा प्रश्‍न नागरिकांकडून विचारण्यातयेत आहे.

raigad
Nagpur flood : वस्त्यांमध्ये सुतकी वातावरण, मनामनात धडकी!

रोहा नगरपालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी नसल्याने अधिकाऱ्यांवर कुणाचाही अंकुश नाही. प्रशासन विकसकांना परवानग्या देण्यात व्यस्त आहे. शास्‍त्रीय पद्धतीने डागडुजी करण्यासाठी मान्यताप्राप्त संस्थेकडून लवकरात लवकर इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे गरजेचे आहे.

समीर शेडगे, तालुकाप्रमुख, ठाकरे गट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com