Raigad News : पालीत रंगणार राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा; होतकरू कलाकार व नाट्यरसिकांना हक्काचे व्यासपीठ!

Theatre Festival : महाराष्ट्रातील होतकरू आणि प्रतिभावंत कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान च्या वतीने डिसेंबर महिन्यात गुरुवार (ता.18) ते बुधवारी (ता.24) राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
Pali Hosts Annual State One-Act Play Contest

Pali Hosts Annual State One-Act Play Contest

sakal

Updated on

पाली : राज्यातील नाट्यरसिकांना देखील ही मोठी पर्वणी आहे. रविवारी (ता. 9) सायंकाळी जांभूळपाडा येथील गोल्ड ग्रीन इस्टेट निर्वाणा येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्पर्धेबाबत माहिती देण्यात आली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या एकांकिकेस 1 लाख, द्वितीय क्रमांक मिळवलेल्या एकांकिकेस 75 हजार तर तृतीय क्रमांक मिळवलेल्या एकांकिकेस 50 हजार रोख रक्कम तसेच रायगड जिल्हा सर्वोत्तम एकांकिका 15 हजार व लक्षवेधी एकांकिका 15 हजार अशी रोख रक्कम बक्षीसे आणि आकर्षक पारितोषिक मिळणार आहेत. स्पर्धेचे यंदाचे हे तेरावे वर्ष आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com