

Major Blow to Shinde Group as 7 Councillors Disqualified in Raigad
esakal
म्हसळा, ता. २८ (बातमीदार) : रायगड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या ‘साहेब’ विरुद्ध ‘शेठ’ असा जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. म्हसळा नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांना जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून पक्षादेशाचे उल्लंघन करणाऱ्या म्हसळा नगर पंचायतीतील सात नगरसेवकांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अपात्र घोषित केले आहे. या निर्णयामुळे शिंदे गटाला जिल्ह्यात मोठा राजकीय फटका बसला आहे.