

Raigad sees rare marsh snake sighting
sakal
पाली : सविस्तर माहिती अशी की निडी गावातील सर्पमित्र दत्तात्रेय वाघमारे यांना त्यांच्या गावात साप आढळल्याची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून पाहणी केली असता, तो साप काहीसा वेगळ्या प्रकारचा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या टीमशी संपर्क साधला. माहिती मिळताच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली व सापाचे बारकाईने निरीक्षण केले. तपासणीनंतर तो साप ग्लॉसी मार्श (Glossy Marsh Snake) या जातीचा अत्यंत दुर्मिळ साप असल्याचे स्पष्ट झाले. सदर सापाला काळजीपूर्वक पकडून सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.