

Rain Fury in Raigad: Monday Holiday Announced for Schools and Colleges
esakal
-अमित गवळे
पाली: भारतीय हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी ५ ते ७ जुलै दरम्यान मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. या हवामानाच्या इशाऱ्यामुळे आणि गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सोमवारी (ता. 6) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.